नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?

https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/

Eknath Khadse : नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?

Eknath Khadse, Jalgaon : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी

तीन आरोपी अद्यापही  फरार आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Related News

छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे.

त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना  जाणीवपूर्वक

अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.

पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत- खडसे

एकनाथ खडसे म्हणाले, छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. घटना घडल्यानंतर

आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे.

तीन प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत. ते फरार झालेले नाहीत, इथले जे आका आहेत.

राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत. याच्या पाठिमागे राजकीय शक्तीच आहे.

मी पूर्वी देखील म्हटलं होतं. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत.

केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचं गृह खात राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न

करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत.

सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

पोलीस आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यातील चित्र पाहिलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की,

काय असं वाटतंय. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसत आहे, अशी टीका खडसेंनी केली.

पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले,  निवडणुकीच्या कालखंडात सरकारने अनेक आश्वासनं दिली होती.

लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र,

आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही.

शेतकऱ्यांसाठी यामध्ये कोणतीही तरतूदी नाही. शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीत

जिंकून येण्यासाठीच्या योजना होत्या. मात्र अर्थ संकल्पात चाळीस हजार रुपयांची तूट आहे. हे जनतेसाठी योग्य नाही.

राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. अनेकांचे देणे थकलेले आहेत. पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.

Read more news here : https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/

 

Related News