मुथूट एक्झिमसाठी ठाणे हे महाराष्ट्रातील तिसरे गोल्ड पॉईंट केंद्र ठरले आहे
या शुभारंभामुळे मुथूट गोल्ड गोल्ड पॉईंट सेंटरला देशातील 23 शहरांमध्ये पोहोचविण्याची संधी लाभली आहे
Related News
ठाणे, दि. 16 मे, 2024: मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप
(जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून त्यांनी ठाण्यातील
नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे,
ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील 23 वे केंद्र बनले आहे. ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल,
जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल.
हे केंद्र शॉप नंबर 01, 02, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका,
सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-400601 येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने 2015 मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते
आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे.
मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हैसूर आणि मदुराई,
या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे.
मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि
त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे
, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल.
सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम
भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की “ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे.
ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन
व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या
आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-
मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत/ उद्योग-प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन
प्रदान करण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे.
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुथूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट
यांनी या शुभारंभाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले की “आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना
आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉईंट सेंटर्सच्या मदतीने
ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत.
महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग
असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) बद्दल थोडक्यात
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुथूट पप्पाचन ग्रुपची मौल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे.
मौल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे.
देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा MEPL हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता.
2015 मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईंट केंद्रासह मुथूट एक्झिम हळूहळू
मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एर्नाकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव,
विशाखापट्टणम आणि म्हैसूर येथे विस्तारले आहे. मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे
एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने
मिळवून देण्यास सुलभता आणतात.
मुथूट पप्पाचन ग्रुप बद्दल थोडक्यात
1887 मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप (MPG) ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून
आणि ग्राहकांसाठी दर्जेदार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे
. मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा,
आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सर्व्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा
आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे 30,000 पेक्षा
अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील 5200 पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत
. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची CSR शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका
(HEEL) यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संपूर्ण समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविण्याचे काम करते