मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक कामकाज पाहणी – मा. निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले

मुर्तिजापूर

मुर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज (दि. १२/११/२०२५) मा. निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी नगर परिषद कार्यालयात भेट देऊन निवडणूक कामकाजाची पूर्वतयारी पाहणी केली.

सर्वप्रथम मा. निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार शिल्पा बोबडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी नीलेश जाधव, तसेच शहर पोलिस निरीक्षक अजित जाधव उपस्थित होते.

Related News

निरीक्षकांनी स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष इत्यादी ठिकाणी भेट देऊन निवडणूक कामकाज पाहणी केली. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता यासारख्या महत्वाच्या बाबींवर चर्चा करून निवडणूक कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

read also : https://ajinkyabharat.com/request-from-farmers-deprived-of-assistance/

Related News