मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 – नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू
मूर्तिजापूर प्रतिनिधी :
मुर्तिजापूर,नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर स्थिर नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उडानपूल पॉईंट–दर्यापूर रोड या प्रमुख मार्गावर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर आज सकाळपासून वाहनांची तपासणी सुरू आहे.
Related News
उद्धव ठाकरे गटाला महापालिका निवडणुकांनंतर पुन्हा धक्का, नितेश राणे आणि भाजपच्या बिनविरोध विजयाची मालिका सुरू
5 फेब्रु...
Continue reading
महापालिका निकालांनंतर राजकीय रणधुमाळी
Continue reading
Vasai-विरार महापौर निवड: राजकीय गणितं तापली, हितेंद्र ठाकूरांचा ‘मास्टरस्ट्रोक’ कोण?
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता Vasai...
Continue reading
Chhatrapati Sambhajinagar: महापौरपदासाठी भाजपमधील जोरदार लॉबिंग, कोण होणार 23 वा महापौर?
मराठवाड्याची राजधानी Chhatrapati संभाजीनगर महापालिकेत महा...
Continue reading
KDMC Mayor Election 2026: कल्याण-दोंबिवली महापालिकेत राजकीय भूचकंप!
KDMC Mayor Election 2026 मध्ये शहरातील राजकारणात भूचकंप! गायब नगरसेवक, राज–शिंदे संमिलन, आणि उद्धव ठाकरे यांना ...
Continue reading
KDMC Election 2026 : राज ठाकरे यांच्या मनसेचा एक मोठा निर्णय आणि राजकीय उलथापालथ
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) मध्ये 2026 च्या निवडणुकीच्या पार्श्व...
Continue reading
अकोट नगरपालिका मध्ये सभापती व समिती सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. नगरपरिषदेत विविध विषय समिती सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवडणूक मंगळवारी झाली, जिथे सर्व पदांवर अविरोध...
Continue reading
Mumbra महापालिका निवडणूक 2026 : सहर शेखच्या विधानांनी खळबळ, आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला धक्का
मुंबई महानगर प्रदेशातील राजकारणात Mumbra ला नेहमीच विशेष ...
Continue reading
Malegaon Politics मध्ये इस्लाम पार्टीच्या यशानंतर मालेगाव महापालिकेत सत्ता समीकरण बदलत आहे. समाजवादी पार्टी, एमआयएम आणि काँग्रेससह नव्या युती...
Continue reading
Instability in the Thackeray Group: कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक फुटण्याची चर्चा; शिंदे गटाकडून महत्त्वाचे पाऊल
Thackeray...
Continue reading
KDMC चा पुढचा महापौर कोण? महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा, 11 नावांची जोरदार चर्चा
KDMC चा पुढचा महापौर कोण? हा प्रश्न सध्या कल्याण-डोंबिवलीतच नव्हे, तर संप...
Continue reading
महापालिका निकालांनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; भाजपचा डाव यशस्वी, ठाकरे गटाला खिंडार
राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ, भाजप सर्वात मोठा पक्ष
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या
Continue reading
तपासणीदरम्यान पोलिस कर्मचारी व उड्डाण पथकाचे अधिकारी मिळून विविध वाहनांची डिक्की, केबिन, बॅग्ज तसेच संशयास्पद वस्तूंची सखोल तपासणी करताना दिसले. निवडणूक काळात अवैध पैसे, दारू, मौल्यवान वस्तू किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची वाहतूक रोखणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.
तपासणीची प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी माध्यम प्रतिनिधीही नाक्यावर उपस्थित होते. वाहनांची तपासणी, कागदपत्रांची चौकशी आणि संशयास्पद वस्तूंची पडताळणी यामध्ये पथक अत्यंत दक्षतेने काम करत आहे. मतदान प्रक्रियेवर कोणताही अनधिकृत प्रभाव पडू नये याकरिता पथक सदैव सतर्क आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,“तपासणीदरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे. निवडणूक शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”