सावंतवाडी शहरात श्रीराम वाचन मंदिर समोर दीपक केसरकर
मित्र मंडळ आणि लोकसभागातून सेल्फी पॉईंट उभारण्याचे काम
सुरू झाले आहे. आकर्षक रीतीने हा सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
आहे. सेल्फी पॉईंटच्या मध्यवर्ती ठिकाणी फळांचा सेट उभारण्यात
येणार आहे. हा सेल्फी पॉइंट नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात
येत होता. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकाळात या सेल्फी
पॉइंटसाठी जिल्हा नियोजन मंडळातून तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत
यांनी आठ लाख रुपये मंजूर केले होते. त्या निधीतून सेल्फी पॉइंटचे काम
सुरू झाले होते चिऱ्याचे बांधकामही करण्यात आले होते. परंतु, गेली दोन
वर्षे हे काम थांबले होते. त्यामुळे सेल्फी पॉईंट होणार की नाही यासंदर्भात
नागरिकात संभ्रमावस्था होती. पूर्वीच्या सेल्फी पॉईंट बाबत शालेय शिक्षण
मंत्री केसरकर यांनीही आक्षेप घेतला होता. परंतु आता दीपक केसरकर
मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून या सेल्फी पॉईंट चे काम
सुरू झाले आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. या संदर्भात मुख्याधिकारी
सागर साळुंखे यांनी दीपक केसरकर मित्र मंडळ आणि लोकसभागातून हा
सेल्फी पॉईंट उभारण्यात येत आहे तो पालिकेकडे असणार आहे असे स्पष्ट केले.
Read also: https://ajinkyabharat.com/ladki-bahine-yojana-banner-ajit-pawars-photo-missing/