नागपूर, 11 फेब्रुवारी 2026 – ‘शून्य विद्युत अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरणने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी विद्युत सुरक्षा शपथ घेण्याचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत सुरक्षिततेचे महत्त्व अधिक दृढ व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या उद्दिष्टाची सातत्यपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी विद्युत सुरक्षेबाबत विविध उपाययोजना आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “विद्युत सुरक्षा ही केवळ नियमावली नसून दैनंदिन कामाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक जीव मौल्यवान असल्याने ‘शून्य विद्युत अपघात’ हेच महावितरणचे ध्येय आहे,” असे आवाहन लोकेश चंद्र यांनी केले.
राज्यातील 664 उपविभाग आणि 3291 शाखा कार्यालयांमध्ये सोमवार ‘सुरक्षा दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे. या दिवशी अभियंते व तांत्रिक कर्मचारी कामाची सुरुवात सुरक्षा शपथेने करतील. त्यानंतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणे आणि तांत्रिक साधनांची तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतरच क्षेत्रीय कामांना प्रारंभ होणार आहे. तसेच तांत्रिक बैठकींची सुरुवातही सुरक्षा शपथेनेच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Related News
नवी मुंबई पोलीस २०२५ रिपोर्ट कार्ड: सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाई, अमली पदार्थविरोधी मोहिमेत ऐतिहासिक यश
नवी मुंबई पोलीस आयुक्ताल...
Continue reading
नागपूर महावितरणच्या चार उपकेंद्रांना आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ 9001:2015’ मानांकन
नागपूर महावितरणच्या कामगिरीत आणखी एक गौरवशाली क्षण ...
Continue reading
नागपूर, दि. ४ फेब्रुवारी २०२६ : महावितरणने नागपूर प्रादेशिक विभागासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत मानकापूर येथे अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. महावितरणचे संचालक (संचल...
Continue reading
नागपूर, दि. 30 जानेवारी 2026: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या अमुल्य बलिदानाचा आदर करण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलात आज 'हुतात्मा दि...
Continue reading
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या नागपूर परिमंडल कार्यालयात उत्साहात ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते ध्वज फड...
Continue reading
मुंबई, दि. २७ जानेवारी २०२६: प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित ध्वजवंदन व संचलन कार्यक्रमात महावितरणचा चित्ररथ प्रमुख आकर्षण ठरला. “
Continue reading
भारतीय प्रजासत्ताक दिनापूर्वी महावितरणच्या नागपूर परिमंडलाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या दीक्षाभूमी आणि खामला या दोन अत्यंत महत्त्वाच्या 33/11 क...
Continue reading
Nagpur मध्ये ८ वर्षीय धनश्रीची हृदयद्रावक हत्या: संपूर्ण प्रकरण, पार्श्वभूमी आणि परिणाम
Nagpur मधून आलेली घटना प्रचंड धक्कादायक आहे. १४ जानेवारी २०२६ र...
Continue reading
वर्धा – १२ जानेवारी : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५–२६” या राज्यस्तरीय उ...
Continue reading
Urfi जावेदसोबत मध्यरात्री धक्कादायक घटना; नेत्याच्या जवळच्या व्यक्तीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल
रिऍलिटी शो स्टार Urfi जावेद ही तिच्या फॅशन आणि स्टाईलसा...
Continue reading
Mumbai डोंबिवली: भटक्या कुत्र्याच्या चाव्याने ५ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
डोंबिवली, Mumbai – शहरातील भटकी कुत्र्यांच...
Continue reading
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महावितरणने कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. जून 2025 मध्ये 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जनजागृती मोहिमेत 2.11 लाख नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले, तर 2.85 कोटी वीजग्राहकांपर्यंत सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला. तांत्रिक कर्मचाऱ्यांना 20 ते 25 प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र ‘टी अॅण्ड पी रजिस्टर मॉड्यूल’ही कार्यान्वित करण्यात आले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/extortion-worth-lakhs-of-rupees-due-to-suspension-of-gram-sevak/