Gas Cylinder explosion: जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती.
Jalgaon Fire Accident : बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर सरार्स सुरु असल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला. जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.
पुणे, मुंबई, जळगावात उपचार
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाले होते. जळगावात बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरताना स्फोट झाल्याच्या घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील जखमी तिघांचाही उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमी 10 पैकी तिघांचा उपचार सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाला. उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
या तिघांचा मृत्यू
रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहन चालक संदीप सोपान शेजवळ अशी मयत तिघांची नावे आहेत. दोघांचा मुंबईत उपचार सुरू असताना तर एकाचा जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधपणे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याची केंद्र ठिकठिकाणी सुरू असून या दुर्घटनेनंतर आता तरी पोलीस संबंधितांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Related News
नेपाळ : घरातील सर्वच गेले… कुत्रा मात्र मालकाची वाट पाहत राहिला; पाच दिवस पडक्या घरासमोर उपाशी, चिखल खातानाचा VIDEO व्हायरल
नेपाळ : नेपाळमध्ये आलेल्या ...
Continue reading
गणेशोत्सवात डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात पुन्हा एकद...
Continue reading
राहुल गांधींचे २९ मुद्दे खोटे; ‘छात्रों की गूंज’वर फडणवीसांचा घणाघाती पलटवार, म्हणाले- ‘ही झूट की गूंज’
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राह...
Continue reading
अभिजीत दीपके यांच्या ५ सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “अप्रिय घटना होईल असे ठोस कारण नाही”
Continue reading
पेट्रोल-डिझेलसाठी परावलंबित्व संपणार? 2030 पर्यंत 50% गरज शेतकरी, तर 50% EV मधून पूर्ण होईल; पुण्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजपच्या कार्यका...
Continue reading
प्रशांत किशोर यांनी विजयाचा प्लॅन दिला, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली तीच चूक; रणनीतीवरून पक्षात मतभेद?
Prashant Kishor NCP News...
Continue reading
Katrina – Vicky Love Story : पहिली ओळख, मैत्री, प्रेम अन् लग्न… अशी सुरू झाली विकी कौशल-कतरिना कैफची प्रेमकहाणी!
Katrina – Vicky : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी...
Continue reading
घटस्फोटानंतर जॉइंट होम लोनचा EMI कोण भरणार? घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
Joint Home Loan Rules : लग्नानंतर अनेक जोडप...
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
हृता दुर्गुळेचा हटके लूक चर्चेत; दोन वेण्या, मोठे कान अन् निरागस अंदाज! ‘आली मोठी शहाणी’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
स्वस्त गॅससाठी करतात हा पर्याय
घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी आहे. त्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा वाहनांसाठी करता येत नाही. त्यानंतरही काही हॉटेल, टपरी आदी ठिकाणी हे गॅस सिलिंडर वापरले जातात. तसेच वाहनांमध्ये भरले जातात. परंतु त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही किंवा प्रशासनाकडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागत आहे.
READ MORE
https://ajinkyabharat.com/amche-fish-food-stall-is-closed-sada-saravankaranwar-koli-woman-santapali-said-ladki-baheen/