या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Related News
अकोला
एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि
शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होत...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे सोमवारी रात्री उशिरा शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत वादाला उधाण आले.
क...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उरळ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे.
फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन चांदीच...
Continue reading
अकोला - सिने सृष्टीत मानाचे असलेल्या चित्रनगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी अकोल्याचे दिग्दर्शक निलेश
जळमकर यांची त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल अखिल भा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
अकोला जिल्ह्यात आजपासून 4 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात जून महिन्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली असून तो...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५
हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी...
Continue reading
मुर्तीजापूर (अकोला) –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात २९ जून रोजी दुपारी स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला.
गुजरातहून नागपूरकडे माती घ...
Continue reading
नवी दिल्ली | 1 जुलैपासून लागू
एलपीजी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी
सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० ची कपात केली आहे. ही...
Continue reading
प्रतिनिधी । भोपाल
हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी ठरलेल्या आरोपीने १० वर्षांची शिक्षा ऐकताच कोर्टातून पलायन केल्याची घटना
भोपालमधील न्यायालयात घडली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू या...
Continue reading
अकोला प्रतिनिधी
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.
अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जक...
Continue reading
बाळापूर (अकोला) प्रतिनिधी
बाळापूर शहरातील मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून
आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटन...
Continue reading
विशाल आग्रे । अकोट प्रतिनिधी
अकोट – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने अकोट
तहसील कार्यालयात बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) ...
Continue reading
तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. सध्या या मतदारसंघात सदा सरवणकर,
अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सदा सरवणकर एका कोळी महिलेशी
संवाद साधताना दिसत आहेत. यात ती कोळी महिला माहीममध्ये फिश फूड स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात
आल्याच्या मुद्द्यावरुन सदा सरवणकरांना प्रश्न विचारत आहेत.
मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न देता आल्याने ते माघारी परतल्याचे दिसत आहे.
सदा सरवणकर आणि कोळी महिलेचा संवाद काय?
या व्हिडीओत सदा सरवणकर हे त्या कोळी महिलेच्या दारात जाऊन मतदान
करण्यास सांगताना दिसत आहेत. त्यात ती महिला सरवणकरांना प्रश्न विचारते.
कोळी महिला : आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. कधी चालू करणार?
सदा सरवणकर : आम्ही लवकरच सुरु करु.
कोळी महिला : आम्ही तुमच्या हातापाया पडून झालं. आमच्या पोटावर आलं आहे.
लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा आम्हाला?
सदा सरवणकर : आम्ही लवकरच सुरु करु, आपण घरात बसून यावर चर्चा करुया का?
कोळी महिला : घरात नको, तुम्ही बाहेरच राहा.
कोळी बांधव सदा सरवणकरांवर नाराज?
असा संपूर्ण संवाद या व्हिडीओत ऐकायला मिळत आहे.
या व्हिडीओत ती कोळी महिला मोठ्या प्रमाणात संतापल्याचे पाहायला मिळत आहे.
तिचा संताप पाहिल्यावर सदा सरवणकर हे काहीही न बोलता तिथून निघून गेल्याचेही दिसत आहेत.
माहीम कोळीवाड्यातून सदा सरवणकरांवर अशाप्रकारे रोष व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे माहीमधील कोळी बांधव हे सदा सरवणकरांवर नाराज आहेत का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
तसेच या नाराजीचा त्यांना फटका बसणार का? अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत.
READ MORE
https://ajinkyabharat.com/mumbais-havechi-quality-khalwali-after-diwali/