महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा थेट परिणाम आता जनतेच्या खिशावर दिसून येतोय.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, फरसबी, गवार, मटार यांसारख्या भाज्यांनी शंभरी पार केली आहे.
यामुळे रोजच्या जेवणाचा खर्च वाढला असून गृहिणींच्या बजेटचा समतोल बिघडला आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
“जो सिंदूर मिटवेल, तो मातीत मिसळेल…
फरसबी, गवार, तोडली, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचे दर सध्या १६० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत.
इतकेच नव्हे तर पापडी १२० रुपये किलो, भेंडी ८० रुपये किलो आणि बीट ६० रुपये किलो मिळत आहे.
लिंबूंनीही महागाईची चव घेतली असून ३ नग २० रुपयांना मिळत आहेत.
महागाईचा हा तडका केवळ स्वयंपाकघरापुरताच मर्यादित नाही. गोकुळ दूध दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ झाली आहे
. यामुळे मुंबई-पुण्यात म्हशीचे दूध ७४ रुपये आणि गायीचे दूध ५८ रुपये लिटरला विकले जात आहे.
राज्यातील इतर भागात हे दर थोडेसे कमी असले तरी महागाईचा परिणाम सर्वदूर जाणवतो आहे.
दरम्यान, मुंबईत प्रवास करणाऱ्यांनाही बेस्टच्या बस दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तिकीट दर दुप्पट झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार आला आहे.
महागाईने सर्वसामान्यांच्या जीवनात अस्वस्थता निर्माण केली असून, पुढील काळात अजून किती दर वाढतील,
याची चिंता आता जनतेला सतावत आहे. शासनाने या महागाईवर काही उपाय योजना करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
READ MORE HEREhttps://ajinkyabharat.com/anti-national-bollam-tar-bye-pakistani-artist-india/