लोकसभा लढा! मी घेतो सभा! मोदींकडून ऑफर…

लोकसभा लढा! मी घेतो सभा! मोदींकडून ऑफर..

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे.

बारामतीत महायुतीच्या सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना आहे. या लढाईला अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी किनार आहे.

असाच काहीसा संघर्ष उत्तर प्रदेशच्या रायबरेलीत पाहायला मिळणार होता. पण कुटुंबात संघर्ष नको.

Related News

कुटुंबातील गोष्टी चव्हाट्यावर यायला नको म्हणून भाजप नेते वरुण गांधींनी हा संघर्ष टाळला. विशेष म्हणजे गांधींनी निवडणूक लढावी यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही होते.

काँग्रेसकडून रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पिलीभीतचे खासदार आणि भाजप नेते वरुण गांधींना विनंती केली होती.

पण निवडणूक म्हणजे काही राजकीय कॉमेडी किंवा सर्कस नाही, असं गांधींनी थेट मोदींना सांगितलं आणि रायबरेलीमधून लढण्याचा प्रस्ताव नाकारला.

मलायला मनोरमानं वरुण गांधीशी याबद्दल संपर्क साधला. ‘मोदी आणि आमच्यात झालेली चर्चा उघड करणं नैतिकतेत बसत नाही,’ असं गांधींनी त्यांना सांगितलं.

पिलीभीतचे खासदार असलेल्या गांधींना भाजपनं यंदा त्या मतदारसंघातून तिकीट दिलेलं नाही.

काँग्रेस रायबरेलीतून प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली. त्यांच्याविरोधात भाजपनं वरुण यांना तिकीट देऊ केलं.

मार्च आणि एप्रिलमध्ये मोदींनी वरुण यांच्याशी संवाद साधला. तुम्ही रायबरेलीतून लढा.

मी स्वत: तुमच्यासाठी प्रचार करेन, सभा घेईन, अशा शब्दांत मोदींनी वरुण यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी त्यांना नकार दिला.

राजकारण म्हणजे माझ्यासाठी सर्कस नाही, जिथे नातेवाईक एकमेकांविरुद्ध लढतात, असं वरुण यांनी मोदींना सांगितलं.

रायबरेलीतून निवडणूक हरलात तरीही तुमचं पुनवर्सन करू, असा शब्द मोदींनी वरुण यांना दिला. पण मोदींची ही ऑफरदेखील वरुण यांनी नाकारली.

मला काही काळ राजकारणापासून दूर राहायचं असल्याचं त्यांनी मोदींना सांगितलं. रायबरेलीतून वरुण गांधींना तिकीट दिल्यास ते चांगली लढत देऊ शकतील, असं भाजपचा अंतर्गत सर्वेक्षण अहवाल सांगतो.

त्यामुळेच गेल्या दोन आठवड्यांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरुण यांना निवडणुकीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण वरुण यांनी लढण्यास स्पष्ट नकार दिला.

 

Also Read: https://ajinkyabharat.com/assembly-elections-are-being-held-as-a-way-to-empty-the-government-treasury-sanjay-rauta/

 

 

Related News