कारंजा शहरातील खवळजनक घटना
कारंजा : शहरातील कारंजा बायपास भागात असलेल्या बाप लेकाच्या किरकोळ वादातून संतप्त बापाने
आपल्या मुलाची पोटात चाकूने वार घालून हत्या केली. ही घटना १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलाची हत्या करणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
मृत मुलाचं नाव अनिल मोखडकर (वय 40) असं आहे.
कारंजा बायपास रोड वरील प्रगती नगर भागात बापानेच दारुड्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
किरकोळ कारणावरून बापाने आपल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक अनिल हा नेहमी मद्यप्राशन करून घरातील सदस्यांसोबत वाद घालत असायचा..
घरगुती बाद असलेल्या क्षुल्लक कारणावरून बाप गोपाल मोखडकर आणि लेक
अनिल यामध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद विकोपाला गेला.
त्यामुळे रागाच्या भरात बापाने मुलाच्या पोटात चाकूने वार केला.
यामध्ये मुलगा अनिल याचा जागीच मृत्यू झाला.
कारंजा शहर पोलिसांनी आरोपी गोपाल मोखडकर याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची चौकशी कारंजा शहर पोलीस करत आहे.
तर दुसरीकडे, शेती आणि संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगत आहे.