लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण थांबले, अंगणवाडी सेविका मागणीवर ठाम, वाचा प्रकरण नेमके काय?

लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण थांबले, अंगणवाडी सेविका मागणीवर ठाम, वाचा प्रकरण नेमके काय?

महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’त नियमांंमध्ये

न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केली जात आहेत. या सर्वेक्षणासाठी

अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात

१५०० रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली होती.

नागपूर : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना महिलांसाठी खास सुरू करण्यात आली.

या योजनेचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणात झाला.

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली.

Related News

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी काही नियम व अटीही लागू करण्यात आल्या होत्या.

मात्र, त्यावेळी या नियम आणि अटीमध्ये न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला.

आता योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलंय.

काही महिलांनी स्वत:हून आपली अर्ज मागे घेतली आहेत.

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यावर महिन्याला 1500 रूपये येतात.

आता या योजनेत निकष हे कठोर करण्यात आली असून सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आलंय.

ज्या भागातून तक्रारी आल्या, त्या भागांमध्ये सर्वेक्षण करून नियम आणि अटीत न

बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केली जाणार आहेत. विशेष म्हणजे जागोजागी सर्वेक्षण केले जात आहे.

हे तर स्पष्ट आहे की, यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांमध्ये मोठी घट होणार.

आता लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास नागपूर येथील अंगणवाडी सेविकांनी नकार दिलाय.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाचा प्रोत्साहन भत्ता हा अजूनही अंगणवाडी सेविकांना मिळाला नाहीये.

यामुळेच अंगणवाडी सेविकांनी हे सर्वेक्षण करण्यास नकार दिला. लाडकी बहीण योजनेच्या एक

अर्ज भरून देण्यासाठी पन्नास रूपये प्रोत्साहन भत्ता सरकार अंगणवाडी सेविकांना देणार होते.

मात्र, अजून त्यांना कोणत्याही प्रकारचा भत्ता सरकारकडून मिळाला नाहीये.

यामुळेच अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास नकार दिला.

आता सर्वेक्षण होणार कसे? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित राहतोय.

सर्वेक्षण करून लाडकी बहीण योजनेत न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केली जाणार आहेत.

मात्र, महिलांनी आतापर्यंत जो लाभ घेतला त्याचे पैसे परत घेणार नसल्याचे सरकारकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आलंय.

विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

READ MORE HERE

https://ajinkyabharat.com/tar-majhan-boat-shahbaz-sharif-naahi-bharatachan-boat-ghath-pakistanchaya-major/

Related News