‘छावा’च्या सेटवरील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगनंतरचा हा व्हिडीओ आहे.
कला दिग्दर्शक बाळा पाटीलने त्याच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Related News
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; केंद्र सरकारकडून आयात शुल्कात मोठी कपात
कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के; कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल...
Continue reading
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित घट; पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बुधवारी झालेल्या...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
Raj Thackeray निवडणूक आयोगावर आक्रमक; ‘१४ आक्षेपांनंतरही निर्णय झाले, मग कर्ताकरविता कोण?’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली ...
Continue reading
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत मोठे संकेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल ...
Continue reading
रस्त्याच्या कडेला दिसणारी ‘तोदरी’ नेमकी काय? आयुर्वेदात बिया, पाने आणि फुलांचा पारंपरिक वापर; जाणून घ्या उपयोग
रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत उगवणाऱ्या अन...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी; 764.7 कोटींच्या सरकारी कामांवरील आरोपांचीही तपासणीमराठा आरक्षणाच...
Continue reading
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही तुफान चर्चेत आहे.
अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी थिएटरमधून बाहेर पडत आहेत.
गणोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी
महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळतं. त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो.
हाच सीन ‘छावा’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे. या क्लायमॅक्सच्या शूटिंगनंतर सेटवर काय घडलं,
हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कला दिग्दर्शक बाळा पाटीलने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेता विकी कौशलला बाळा करकचून मिठी मारताना दिसतोय.
क्लायमॅक्सच्या शूटिंगनंतर विकीच्या शरीरावरील रंग जसंच्या तसं असतानाही बाळाने त्याला घट्ट मिठी मारली आहे.
यावेळी सेटवर उपस्थित इतरही क्रू मेंबर्स भारावलेले दिसत आहेत.
‘तुम्ही त्यागीले शरीर तुमचे, पण तुम हो अमर महाराज, तुमचे विचार आम्हास सदैव अजरामर महाराज,
आप सदैव अजरामर महाराज.., कसे आभार करावे तुमचे महाराज. तुम्ही त्यागीले प्राण..धर्म अमर करण्या महाराज.
महाराज.. तरुणाई रडली पाहुनी गाथा शौर्याची, राज्यात विस्तारली प्रथा बलिदान आणि त्यागाची!
स्वीकार करावा माझा मुजरा महाराज.. मुजरा महाराज…मुजरा महाराज. पर जंजिरो मे जकडा राजा मेरा अब भी सबपे भारी हैं.
नाट्य रुपात का होईना , सोळावे शतक जगण्याची, महाराजांना मिठी मारण्याचं सौभाग्य मला लाभलंय. असंख्य वेदना जाणवूनही,
अलगद चेहऱ्यावर हसू, मुखातून नकळत आलेलं जगदंबचे बोल मी अनुभवल्यात,’ अशा शब्दांत बाळाने भावना व्यक्त केल्या आहेत.
बाळाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘भाऊंनी शर्ट जपून ठेवला असेल’,
असं एकाने लिहिलं. तर ‘खूप छान अभिनय केला आहे विकी कौशलने आणि तू त्याला अशी दाद दिलीस.
हे भारावून जाणं एक खरा मावळाच करू शकतो. जगदंब’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
‘भावा तू भाग्यवान आहेस’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
Read more news here : https://ajinkyabharat.com/khurchi-fix-naahi-continue-aali-me-kayu-karu-ajitdadancha-shindenna-mishkeel-tola/