आयफोन झाले स्वस्त!

केंद्रीय अर्थमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी मोबाईल फोन,

चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला.

अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तशी घोषणा केली.

Related News

दरम्यान, या घोषणेनंतर आता जगप्रसिद्ध ॲपल या कंपनीने

मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी

कमी करण्याची घोषणा केली आहे.

केंद्राने सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर ॲपलने हा निर्णय घेतला आहे.

आयफोन 13, 14 आणि 15 च्या किमतीत झाली घट 

ॲपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता या कंपनीच्या प्रो, प्रो मॅक्स

यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

मेड इन इंडिया आयफोन  13, 14 आणि 15 च्या दरातही

साधारण 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे.

यासह आयफोन एसई च्या किमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

ॲपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडेल्सच्या किमतीत घट केली आहे.

आयफोनचे नवे दर: 

आयफोन एसई – 47600 रुपये
आयफोन13 – 59,600 रुपये
आयफोन 14  – 69,600 रुपये
आयफोन 14 प्लस  – 79,600 रुपये
आयफोन 15 – 79,600 रुपये
आयफोन 15 प्लस – 89,600 रुपये
आईफोन 15 प्रो – 1,29,800 रुपये
आयफोन 15 प्रो मॅक्स – 1,54,000 रुपये

Read also: https://ajinkyabharat.com/2nd-august-meeting-regarding-planning-of-akola-kavad-yatra/

Related News