होंडाकडून इंडस्ट्री-फस्ट एक्स्टेण्डेड वॉरंटी लाँच

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील

आघाडीच्या प्रीमियम कार्स उत्पादक कंपनीने आज म्हणजेच

दिनांक ४ ऑक्टोबरला इंडस्ट्री-फस्ट एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामच्या

Related News

लाँचची घोषणा केली, जे जवळपास ७ अनलिमिटेड किलोमीटर

कव्हरेज देईल . ही उल्लेखनीय वॉरंटी कस्टमर अशुअरन्समध्ये

नवीन मानक स्थापित करेल, तसेच कारमालकांनी कितीही प्रवास

केला तरीही ते त्यांना अद्वितीय समाधान देईल. ही एक्स्टेण्डेड

वॉरंटी सध्याचे मॉडेल श्रेणी एलीव्हेट, सिटी, सिटी ई: एचईव्ही

आणि अमेझच्या पेट्रोल व्हेरियंटसवर देण्यात आले आहे. ग्राहकांनी

लवकर एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामसाठी नोंदणी केल्यास हा प्रोग्राम

इतर मॉडेल्स सिव्हिक, जॅझ आणि डब्ल्यूआर- व्हीची पेट्रोल

व्हेरिएण्ट्सवर देखील ऑफर करण्यात येईल. हा उपक्रम होंडाच्या

एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्रामचा भाग आहे, ज्यामधून ग्राहकांना सर्वो

त्तम तंत्रज्ञान आणि मालकीहक्क अनुभव देण्याप्रती होंडाची

कटिबद्धता दिसून येते. ही एक्स्टेण्डेड वॉरंटी होंडा कारमालक

अधिक मूल्य व कव्हरेजचा आनंद घेण्याची खात्री घेण्यासाठी

डिझाइन करण्यात आली आहे. कारचालक दैनंदिन प्रवासासाठी

किंवा लांब अंतरापर्यंतच्या प्रवासासाठी व्हेइकल्स ड्राइव्ह करत

असले तरी ही एक्स्टेण्डेड वॉरंटी त्यांना अनलिमिटेड अंतरापर्यंत

कव्हरेजची खात्री देते. या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत होंडा

कार्स इंडिया लि.च्या मार्केटिंग अँड सेल्सचे उपाध्यक्ष कुणाल बहल

म्हणाले, “होंडा कार्स इंडियामध्ये आम्ही ग्राहक मालकीहक्क

अनुभव अधिक उत्साहित करण्याप्रती कटिबद्ध आहोत. होंडा

कार्सचा प्रबळ टिकाऊपणा, दर्जा व विश्वसनीयता या स्थापित

मूल्यांचे पाठबळ असण्यासह जवळपास ७ वर्षांपर्यंतच्या

अनलिमिटेड किलोमीटरने युक्त हा एक्स्टेण्डेड वॉरंटी प्रोग्राम खात्री

देतो की ड्रायव्हिंग पॅटर्नची पर्वा न करता प्रत्येक ग्राहक

दीर्घकाळापर्यंत संरक्षणाचा अनुभव घेऊ शकतो. आमचा विश्वास

आहे की, ही नवीन ऑफरिंग उद्योगासाठी गेमचेंजर ठरेल आणि

ग्राहकांच्या व्हेईकल मालकी हक्क संदर्भातील अपेक्षांना नव्या

उंचीवर घेऊन जाईल. ग्राहक कार खरेदी केल्याच्या तारखेपासून २

वर्षांमध्ये ७ वर्ष अनलिमिटेड किलोमीटर एक्स्टेण्डेड वॉरंटीचा

अवलंब करू शकतात, तसेच त्यांना स्टॅण्डर्ड वॉरंटीच्या अखेरपर्यंत

इतर पर्याय देखील उपलब्ध होतील, ज्यामुळे स्थिरता व

दीर्घकालीन संरक्षण मिळेल.

Read also:https://ajinkyabharat.com/second-diwali-purvi-sonyachyas-modle-serve-record/

Related News