भारत-अमेरिका मोठा संरक्षण करार: नौदलाच्या MH-60R हेलिकॉप्टर ताफ्यासाठी 7,995 कोटींचा सपोर्ट डील
भारत आणि अमेरिका यांच्यात संरक्षण सहकार्याला आणखी एक मोठा बळकटी देणारा करार करण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या 24 अत्याधुनिक ‘MH-60R सीहॉक’ हेलिकॉप्टर ताफ्यासाठी पाच वर्षांच्या सतत सहाय्य व देखभाल (Follow-on Support) साठी सुमारे 7,995 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
हा करार अमेरिकेच्या Foreign Military Sales (FMS) कार्यक्रमांतर्गत Letter of Offer and Acceptance (LOA) च्या माध्यमातून करण्यात आला असून, लॉकहीड मार्टिन कंपनीद्वारे उत्पादित MH-60R हेलिकॉप्टरांसाठी आवश्यक स्पेअर पार्ट्स, उपकरणे, तांत्रिक सपोर्ट, प्रशिक्षण, दुरुस्ती व देखभाल सुविधा या सर्व बाबींचा यात समावेश आहे.
सर्व हवामानात कार्यक्षम MH-60R
MH-60R हे ‘ब्लॅकहॉक’ हेलिकॉप्टरचे समुद्री स्वरूप असून, ते सर्व हवामानात कार्य करण्यास सक्षम आहे. यामध्ये
Related News
रोहित पवार पक्षात एकटे पडले? अखेर मौन सोडले; शरद पवारांच्या पत्राचा दिला दाखला!
महावितरणचा थकबाकीदारांना मोठा दिलासा! 69 हजार ग्राहकांना ‘अभय’चा आधार; व्याज-विलंब आकार 100 टक्के माफ!
अकोट नगर परिषदेच्या सभेत 13 ठरावांना मंजुरी; दोन ठराव रद्द, विकासकामांना मिळणार गती!
अकोल्यातील सिद्धिविनायक मंदिरात प्रत्येक संकष्टीला पोलीस बंदोबस्त द्या!; निलेश देव यांची मागणी
पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिफारस!
EPFO ची 8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! आता UPI द्वारे मिनिटांत काढता येणार PF चे पैसे?
बोगस शिक्षक भरतीचा मोठा पर्दाफाश! बीडमध्ये ७३ शिक्षकांची सेवा समाप्त, आणखी २,२१७ जण रडारवर!
गोवंश कत्तलीसाठी गाय खरेदी केली तर थेट मोक्का! चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा
अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास? भाजपचा खळबळजनक दावा!
भाजप आमदार महेश बालदी यांना 3 वर्षांचा सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा मोठा निर्णय!
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! आणखी ६ तालुके दुष्काळग्रस्त यादीत; सरकारचा मोठा निर्णय
वकान्यात राजकीय दिग्गजांची मांदियाळी! श्रीकांत शिंदे, सचिन अहिर यांची उपस्थिती
Anti-Submarine Warfare (ASW)
Anti-Surface Warfare (ASuW)
अशा प्रगत युद्ध क्षमतांचा समावेश आहे. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे, सागरी गस्त, लक्ष्य शोध व हल्ले करणे अशा अनेक मोहिमांमध्ये हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावते.
आधीही झाला होता मोठा करार
फेब्रुवारी 2020 मध्ये भारताने 24 MH-60R हेलिकॉप्टर खरेदीसाठी 15,157 कोटी रुपयांचा मूळ करार केला होता. त्यातील पहिले तीन हेलिकॉप्टर 2021 मध्ये भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते. संपूर्ण ताफ्याची INAS 334 स्क्वाड्रन म्हणून मार्च 2024 मध्ये कोच्ची येथील INS गरुड येथे तैनाती पूर्ण झाली.
‘आत्मनिर्भर भारत’ला चालना
संरक्षण मंत्रालयानुसार, हा नवीन सपोर्ट करार दीर्घकालीन क्षमता विकास सुनिश्चित करेल तसेच अमेरिकेवरील थेट अवलंबित्व कमी करेल. हा करार ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाशी सुसंगत असून, यामधून भारतीय MSME कंपन्या व देशांतर्गत उद्योगांना मोठी संधी मिळणार आहे.
भारतामध्येच मध्यम पातळीवरील सुटे भाग दुरुस्ती व कालावधी देखभाल सुविधा विकसित करण्याचा समावेश या करारात आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादन, सेवा विकास व रोजगाराला चालना मिळणार आहे.
नौदलाच्या ताकदीत वाढ
या करारामुळे भारतीय नौदलाला हेलिकॉप्टर विविध ठिकाणी व नौदलाच्या जहाजांवरून अधिक प्रभावीपणे चालवण्याची क्षमता मिळणार आहे. प्राथमिक तसेच दुय्यम मोहिमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी सुनिश्चित करता येणार आहे.
हा करार भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करणारा ठरेल तसेच हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/push-urgent-update-on-airbus-a320-aircraft/
