प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

नरसिंहानंद

यती नरसिंहानंद सरस्वतींना घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशाच्या गाजियाबाद येथील दासनादेवी मंदिराचे विश्वस्त

यती नरसिंहानंद सरस्वती यांनी शुक्रवारी मुस्लीम समाज तसेच

Related News

प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या

विधानाचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी

हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. दरम्यान, आता गाजियाबाद

पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत यती नरसिंहानंद सरस्वती

यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या हवाल्याने

यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, पोलिसांनी यती नरसिंहानंद

सरस्वती तसेच त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतलं

आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

त्यामुळे विविध चर्चानाही उधाण आलं आहे. दरम्यान, शुक्रवारी मुस्लीम

समाज तसेच प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर

यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात

आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आता गाजियाबाद पोलिसांनी ही

कारवाई केली.

Read also: https://ajinkyabharat.com/neelam-gorhes-advisory-regarding-ajit-pawar-group/

Related News