नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका करणे बंद केले आहे, असा गंभीर आरोप करून लोकसभा निवडणुकीचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्याच दिशेला नेला. कधीही अदानी-अंबानीवर न बोलणाऱ्या मोदींनी थेट प्रचारसभेत या उद्योगपतींची नावे घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, मोदींच्या याच आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अतिशय जोरकसपणे उत्तर दिले.
नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का? एरवी आपण अदानी-अंबानींच्या गोष्टी बंद खोलीत करता. आज पहिल्यांदाच जाहीररित्या आपण अदानी-अंबानींचे नाव घेतले. ते टेम्पोमधून पैसे देतात, हे तुम्हाला कसे माहितीये? तुमचा हा वैयक्तिक अनुभव आहे का? असा चिमटा काढत राहुल गांधी यांनी मोदींना डिवचले.
तसेच सीबीआय आणि ईडीला अदानी आणि अंबानींकडे पाठवून न घाबरता त्यांची संपूर्ण चौकशी करा, असे आव्हानही राहुल गांधी यांनी मोदींना दिले. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, “मी देशाला सांगू इच्छितो नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा या दोघांना दिलाय तेवढाच पैसा आम्ही भारतातल्या गरीब लोकांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी पक्की योजना या आणि अशा योजनांच्या माध्यमातून करोडो लोकांना आम्ही लखपती बनवू, असे देशातील तमाम लोकांना सांगू इच्छितो…”
Related News
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताचे
नाव घेत पाकिस्तानच्या जनतेला एक वचन दिले आहे.
ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागत आहे.
इस्लामाबाद: पाक...
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी डिजिटल सेवा कर लादणाऱ्या देशांमधून
आयात केलेल्या वस्तूंवर टॅक्स (शुल्क) लावण्याचे आदेश दिले आहेत,
ज्याचा परिणाम भारतावरही होईल.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्...
Continue reading
शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’,
असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला.
तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली....
Continue reading
आतापर्यंत साप साप म्हणून भुई थोपटणारे भाजपा आमदार सुरेश धस
गेल्या दोन दिवसात पुरते अडचणीत सापडले आहे.
विरोधकांच्या आरोपानुसार,
बीडमध्ये धनंजय मुंडेंविरोधातील त्यांची भूमिकाच स...
Continue reading
संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे.
आज जे काही लोक आम्हाला सोडून जात आहेत,
ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या कारवाईला घाबरून जात आहेत.
दुसरं काही नाही. आमच्या हातात फक्...
Continue reading
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली महत्त्वाची
ऑफर भारताने नाकारली आहे. पीएम मोदी यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भारत
आणि चीन प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्य...
Continue reading
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सु...
Continue reading
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yoajana : पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती आहे.
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने...
Continue reading
Shambhuraj Desai : ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं,
तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला शिवसेनेचे आमदार शंभूराज...
Continue reading
मणेरा यांचे विकासाच्या मुद्याकडे लक्ष केंद्रीत; विद्यमान आमदारांना रोखण्याचे ठाकरे गटापुढे मोठं आव्हान आहे.
भाईंदर/विजय काते : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार...
Continue reading
मनोज जरांगे यांचा रोकडा सवाल; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपावर पुन्हा हल्ला
Manoj Jarange on BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा
...
Continue reading
राहुल गांधी यांचा व्हिडीओतून मोदींवर हल्लाबोल
नमस्कार मोदीजी, थोडेसे घाबरला आहात का? एरवी आपण अदानी-अंबानींच्या गोष्टी बंद खोलीत करता. आज पहिल्यांदाच जाहीररित्या आपण अदानी-अंबानींचे नाव घेतले. ते टेम्पोमधून पैसे देतात, हे तुम्हाला कसे माहिती? हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? मी देशाला सांगू इच्छितो नरेंद्र मोदींनी जेवढा पैसा या दोघांना दिलाय तेवढाच पैसा आम्ही भारतातल्या गरीब लोकांना देणार आहोत.
अदानी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? मोदींचा सवाल
मागील पाच वर्ष काँग्रेसचे राजकुमार अदानी आणि अंबानी यांच्यावर आरोप करत होते. मात्र निवडणूक जाहीर होताच अचानक त्यांनी अदानी अंबानींवर बोलणे बंद केले. दोन्ही उद्योगपतींकडून त्यांना किती बॅगा भरून काळा पैसा मिळाला? अदानी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? ज्यामुळे आता एका रात्रीत राहुल गांधी यांचा दृष्टीकोन बदलला, असा सवाल करून मोदींनी राहुल यांच्यावर टीका केली.