Holi Laws For Applying Colours: बळजबरीने इतरांवर रंग लावल्यास तो व्यक्ती तुरुंगात जाऊ शकते. याबाबत कोणते नियम आहेत ते आधीच जाणून घ्या.
Holi Laws For Applying Colours: होळी (Holi Laws) हा आनंदाचा, रंगांचा आणि आपुलकीचा आहे. उद्या म्हणजेच
14 मार्च रोजी देशभरात होळी (Holi Laws) साजरी होणार आहे. होळीच्या दिवशी संपूर्ण देश वेगवेगळ्या रंगात रंगणार आहे.
Related News
रस्ते, गल्ल्या, सर्व रंगांनी रंगवलेली दिसून येतील. या दिवशी, लोक होळीचा सण त्यांच्या कुटुंबियांसह,
मित्र आणि परिचितांसह मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. एकमेकांवर रंग आणि गुलाल उधळला जातो.
मात्र, काही ठिकाणी लोक अनोळखी व्यक्तींवर रंग फेकत असल्याचेही दिसून येते. अनेक वेळा रस्त्यावरून
जाणाऱ्यांना रंग लावण्याची सक्ती केली जाते. तुम्हालाही कोणालाही जबरदस्तीने रंग लावण्याची आवड असेल तर.
मग सावध राहा. कारण असं करणाऱ्यांना त्याची शिक्षा मिळू शकते, याबाबत काय निय आहेत,
ते जाणून घ्या सविस्तर. (Holi Laws For Applying Colours)
पाण्याचे फुगे फेकले तर..
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर लोक रंग फेकत असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे अनेकवेळा पाण्याचे फुगे लोकांवर फेकले जातात.
पण असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. या कामासाठी तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
यासाठी काय नियम आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. होळीच्या दिवशी कोणी पाण्याचा फुगा फेकत असेल तर त्याच्यावरतीही कारवाई होऊ शकते.
यासाठी बीएनएसवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत
बीएनएस कलम 120(1) अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कलम 120(1) अन्वये जाणून बुजून दुखापत केल्याच्या
आरोपाखाली तुरुंगात पाठवले जाऊ शकते. यामुळे एक वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.
यासोबतच दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते.
काय आहेत नियम? काय होऊ शकते शिक्षा?
कोणालाही जबरदस्तीने रंग लावल्यास तुमच्या अडचणी वाढू शकतात. बळजबरीने इतरांवर रंग
लावल्यास तुम्ही तुरुंगात (Holi Laws) जाऊ शकता. याबाबत कोणते नियम बनवले आहेत ते आधीच जाणून घ्या.
होळीच्या दिवशी बळजबरीने रंग लावून कोणाचे काही नुकसान होत असल्यास अशा परिस्थितीत तुम्हाला BNS च्या
कलम 125 अंतर्गत 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो किंवा तुम्हाला 1 वर्ष किंवा दोन्ही तुरुंगवास होऊ शकतो.
जर कोणी महिलांना, तरूणींंना जबरदस्तीने रंग लावत असल्यास मग बीएनएस कलम 79 अंतर्गत महिलेच्या
प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 3 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि
दंड आकारला जाऊ शकतो. होळीच्या दिवशी एखाद्याचा रस्ता अडवला जातो आणि त्याच्यावर जबरदस्तीने रंग टाकले जातात
आणि त्रास दिला जातो. मग बीएनएस कलम 345 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
ज्यामध्ये 1 महिन्याची तुरुंगवास किंवा 5000 रुपये दंड होऊ शकतो. किंवा दोन्ही शिक्षा असू शकतात.
एखाद्याला रंग लावण्याची सक्ती केली तर मारामारी आणि हाणामारी होते. मग अशा प्रकरणात बीएनएस
कलम 150 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
त्यामुळे होळीवर रंग लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या प्रियजनांसोबत होळी साजरी करा.
Read more news here: https://ajinkyabharat.com/natichi-chhedhakad-eknath-khadse-in-ethalya-akachan-absconding-accused-3-accused-ajun-absconding/