दिल्ली, केरळमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भारतीय हवामान

भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरुवारी दिल्ली आणि केरळमध्ये

मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे.

त्यासोबतच राष्ट्रीय राजधानीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Related News

मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्टवर असलेल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र,

हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक,

उत्तर प्रदेश आणि गोवा यांचा समावेश आहे.

देशभरातील अनेक ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी झाल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे.

वायनाड येथील भूस्खलनात शेकडो लोकांचा बळी गेला आहे.

त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

IMD ने दिल्लीतील रहिवाशांना निसरडे रस्ते, कमी दृश्यमानता,

रहदारीतील व्यत्यय आणि मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे

यांमुळे अपघाताची शक्यता विचारात घेऊ सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दिल्लीत 5 ऑगस्टपर्यंत मधूनमधून पावसाची शक्यता आहे.

IMD हवामान अंदाज वर्तवताना नुकतेच म्हटले आहे की,

राजधानीत वादळी वारे पाहायला मिळू शकते. राजधानीत ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या या काळात बाधित भागातील रहिवाशांना

सतर्क राहण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, वृत्त आहे की, दिल्लीतील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने

सकल भागात पाणी साचले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये

पावसाने काहीशी उघडीप दिली आहे.

अधूनमधून हलक्या ते मध्यम पवसाच्या सरी बरसत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/price-of-commercial-lpg-cylinder-increased-by-rs-8-50/

Related News