एचडीएफसी लाइफकडून ११ टक्के मार्केट शेअरची नोंद

एचडीएफसी लाइफच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२४

रोजी समाप्त झालेल्या सहामाहीसाठी स्वतंत्र व एकत्रित

आर्थिक निकाल मंजूर करून स्वीकारला आहे. कंपनीने सर्व

Related News

महत्त्वपूर्ण बाबींमध्ये मोठी वाढ केली असून, सकारात्मक

गती राखली आहे. नवीन बिझनेस प्रीमियममध्ये (वैयक्तिक

एपीई) प्रबळ ३१ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

एचडीएफसी लाइफच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य

कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्हणाल्या आहे की,

“खाजगी क्षेत्र आणि एकूण उद्योगाने दुसऱ्या तिमाहीमधील

प्रबळ वाढ कायम ठेवली आहे. तसेच आर्थिक वर्ष २५ च्या

पहिल्या सहामाहीत वैयक्तिक भारित प्राप्त प्रीमियम बेसिसमध्ये

अनुक्रमे २४ टक्के आणि २१ टक्के वाढीची नोंद केली. याच

कालावधीदरम्यान बँकेने २८ टक्क्यांची आणि २ वर्ष सीएजीआर

बेसिसवर १९ टक्क्यांची वाढ करत खाजगी क्षेत्राला मागे टाकले

आहे. १ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सुधारित नियमनांचे पालन करत

४० हून अधिक टॉप उत्पादने यशस्वीरित्या रिलाँच केली आहेत.

ज्यांनी व्यवसायामध्ये जवळपास ९५ टक्क्यांचे योगदान दिले आहे.

तसेच बँक तिमाहीदरम्यान इतर उत्पादने देखील रिलाँच करणार

आहे. नवीन उत्पादन नियमनांशी संलग्न होण्याकरिता तीन

महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यासाठी आम्ही नियामकांचे

आभार व्यक्त करते. असेही त्यांनी म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/no-entry-into-pdkv-area-without-prior-permission/

Related News