गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Related News
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
पीडित महिलेने रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ICU मध्ये घडली घृणास्पद घटना
पीडित एअर होस्टेस 5 एप्रिल रोजी गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती.
ती ICU मध्ये वेंटिलेटरवर होती. महिलेच्या तक्रारीनुसार,
6 एप्रिल रोजी ICU मध्ये असताना काही रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण केले.
हॉटेलमधील आजारानंतर रुग्णालयात दाखल
46 वर्षीय पीडित महिला एका हॉटेलमध्ये राहात होती. स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर
तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिला 13 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
पतीला सांगून पोलिसांत तक्रार
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडितेने ही घटना आपल्या पतीला सांगितली आणि नंतर गुरुग्रामच्या
सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर अज्ञात रुग्णालय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासात, लवकरच आरोपी हाती लागणार
पोलीस अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपींची ओळख पटवण्यासाठी तपास पथक कार्यरत आहे.
पीडितेचा जाबब न्यायालयात मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, लवकरच आरोपींचा शोध लागेल आणि कारवाई होईल.
रुग्णालयाचा अधिकृत प्रतिसाद
या घटनेवर रुग्णालयाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे,
“एक रुग्णाच्या तक्रारीची आम्हाला माहिती मिळाली असून, आम्ही याबाबत अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.
याप्रकरणातील संबंधित काळातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली आहेत.
सध्या कोणत्याही आरोपाची अधिकृत पुष्टी झालेली नाही.”
ही घटना आरोग्य सेवा व्यवस्थेतील सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उपस्थित करत आहे.
याप्रकरणी कायदेशीर कारवाई आणि पीडितेला न्याय मिळण्यासाठी समाजातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/urdu-konatyahi-dharmachi-language-nahi-patur-palikeryl-urdu-falakala-supreme-jurine-recognition/