दिव्यांगांच्या रोजगारासाठी अकोल्यात विशेष कला दालन; 24-25 जूनला आयोजन

दिव्यांगां

अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन यांच्या संयुक्त विद्यमाने 24 व 25 जून 2026 रोजी विशेष कला दालनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जठारपेठ येथील हॉटेल शगुन येथे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनात दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या विविध हस्तकला व पूजासाहित्याचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. यामध्ये बांबूविरहित अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, राळ, हवन सामग्री, वाती, फुलांच्या माळा, तोरणे, वेलवेट आसन, आयुर्वेदिक फेस पॅक, लोकरी शोभिवंत वस्तू, कापडी पिशव्या आणि कागदी लिफाफे आदी उत्पादनांचा समावेश आहे.

संस्थेच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी 9423650090 या हेल्पलाइनवर नोंदणी करावी, असे अनुराधा साठे यांनी सांगितले. तसेच अकोलेकरांनी या कला दालनाला भेट देऊन दिव्यांग कलाकारांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या स्वावलंबनाला हातभार लावावा, असे आवाहन डॉ. संजय तिडके आणि प्रा. अरविंद देव यांनी केले आहे.

Related News

read also:  https://ajinkyabharat.com/shocking-only-4-blooms-thokoon-tasala-%e2%82%b9-10-thousand-carpenters-monthly-income-in-america-goes-up-to-%e2%82%b9-10-lakhs-know-7-big-reasons/

Related News