Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने आणि चांदीची घोडदौड कायम आहे. गाझा पट्टीत शांतता नांदल्यानंतर
आता युक्रेन-रशियात सुद्धा शांतीपर्व सुरू होत आहे, पण त्याचे कसेलच सोयरसुतक या धातुना नाही.
आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…
Related News
जगात शांती पर्व परत आले आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध तहाच्या मार्गावर येऊन ठेपले आहे.
गाझा पट्टीत नागरीक परतू लागले आहेत. शांतीपर्व आले असले तरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या
आक्रमक आर्थिक, व्यापारी, व्यावसायिक धोरणामुळे जगात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कोणत्याही शांतीपर्वाचा सोने
आणि चांदीवर कुठलाही परिणाम दिसून आला नाही. दोन्ही धातुची तुफान घोडदौड सुरू आहे. ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडला आहे.
आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 21 March 2025 )
सोन्याच्या किंमतीत तुफान
गेल्या आठवड्यात सोन्याने 1300 रुपयांचा तडका लावला होता. सुरूवातीला सोन्याने ग्राहकांना 110 रुपयांचा दिलासा दिला होता.
त्यानंतर किंमतीत सतत वाढ होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी दर वधारले.
गुरूवारी 220 रुपयांनी किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,250
रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीमध्ये मोठी वाढ
चांदीने सोन्याशी स्पर्धा सुरू केली आहे. या सोमवारी चांदी 100 रुपयांनी उतरली.
मंगळवारी 1100, बुधवारी 1000 रुपये तर गुरुवारी 100 रुपयांनी किंमत वधारली.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,100 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने
88,506, 23 कॅरेट 88,152, 22 कॅरेट सोने 81,072 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,380 रुपये, 14 कॅरेट सोने 51,776 रुपये
प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,392 रुपये इतका झाला. वायदे बाजारात
आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.
तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल.
त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या,
शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात.