PM मोदींचं इंधन बचतीचं आवाहन; देशात लॉकडाऊन लागणार? पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं स्पष्टीकरण
नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा अवलंब करावा, परदेश दौरे टाळावेत आणि पुढील काही काळ सोन्याची खरेदीही टाळावी, असा सल्ला मोदींनी दिला. मात्र या आवाहनानंतर देशभरात लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या २४ तासांत दोन वेळा मोदींनी इंधन बचतीचा उल्लेख केल्याने नागरिकांच्या मनात चिंता वाढली. कोविड काळात जसं वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात आले होते, त्याच धर्तीवर पुन्हा काही निर्बंध लागू होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला. सोशल मीडियावरही याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचंही दिसून आलं.
दरम्यान, या सर्व चर्चांवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. देशात इंधनाची कोणतीही टंचाई नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी ठामपणे नमूद केलं.
Related News
Heat Alert Maharashtra : पुढचे 3 दिवस धोकादायक! ‘या’ 12 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा गंभीर इशारा
Trending News: 1 सायकल आणि मोठा संदेश! SP धर्मेंद्र सिंह यांची दमदार ‘नो व्हेईकल’ मोहीम देशभर चर्चेत
Watermelon Death Case: 15 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, कलिंगड खाल्ल्यानंतर 3 मुलांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचा धक्कादायक इशारा
साताऱ्याच्या भूमीचा अभिमान; मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाईंचा तात्काळ प्रतिसाद
-
By
Vivek Raut
PM Modi Economic Strategy : रुपया 95.58 पार… डॉलरला धोबीपछाड देण्यासाठी मोदींची मोठी आर्थिक रणनीती?
PM मोदींच्या आवाहनानंतर छगन भुजबळांचा मोठा इशारा; “जगात संभ्रमाची स्थिती”
-
By
Vivek Raut
इराणच्या विमानांवरून पाकिस्तान जगासमोर एक्स्पोज? अमेरिकेचे गंभीर आरोप
-
By
Vivek Raut
मोठा धक्का! NEET UG 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या आरोपांनंतर CBI चौकशीचे आदेश
-
By
Vivek Raut
मोदींच्या आवाहनानंतर चर्चेत सोनं; भारताचा गोल्ड रिझर्व्ह किती
-
By
Vivek Raut
सीआयआयच्या वार्षिक व्यापार परिषदेत बोलताना पुरी म्हणाले की, “भारताकडे सध्या ६९ दिवसांचा खनिज तेलाचा साठा उपलब्ध आहे. तसेच ४५ दिवसांचा एलएनजी साठाही देशाकडे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं की, पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम लक्षात घेऊन सरकारने एलपीजी उत्पादनात मोठी वाढ केली आहे. आधी दररोज ३५ ते ३६ हजार टन एलपीजी उत्पादन होत होतं. आता ते वाढवून ५४ हजार टन प्रतिदिन करण्यात आलं आहे. त्यामुळे घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदींनी केलेल्या आवाहनाचा अर्थ काटकसरीचा संदेश असा असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जागतिक परिस्थितीमुळे भारताच्या महसुली तुटीवर दबाव वाढत असल्याचंही पुरी यांनी मान्य केलं. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे. भारत हा मोठ्या प्रमाणावर तेल आयात करणारा देश असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. जगातील मोठा तेलपुरवठा या मार्गाने होतो. जर या मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली, तर जागतिक स्तरावर तेलाचे दर झपाट्याने वाढू शकतात. याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि इतर इंधनांच्या किमतींवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर मोदींनी देशवासीयांना इंधन बचतीचा सल्ला दिला आहे. अनावश्यक वाहन वापर कमी करावा, शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं, असं त्यांनी सूचित केलं. तसंच, परदेश दौरे कमी करून परकीय चलनाची बचत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
मोदींनी सोनं खरेदी टाळण्याचा केलेला उल्लेखही चर्चेचा विषय ठरला. भारतात मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केली जाते. जागतिक आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळे पुढील वर्षभर नागरिकांनी गरज नसल्यास सोनं खरेदी टाळावं, असा अप्रत्यक्ष संदेश मोदींनी दिल्याचं मानलं जात आहे.
राजकीय वर्तुळातही या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला. तर सरकार समर्थकांनी मोदींच्या वक्तव्याचं समर्थन करत हा दूरदृष्टीचा निर्णय असल्याचं म्हटलं.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, सरकार सध्या नागरिकांना संभाव्य जागतिक संकटासाठी मानसिकदृष्ट्या तयार करत आहे. कोविडनंतर जागतिक अर्थव्यवस्था अजूनही पूर्णपणे स्थिर झालेली नाही. त्यातच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे भारताने ऊर्जा बचत आणि आयात नियंत्रणावर भर देणं आवश्यक ठरू शकतं.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून पेट्रोल किंवा गॅसचा अतिरिक्त साठा करू नये, असं आवाहनही सरकारकडून करण्यात आलं आहे. सध्या देशात पुरेसा तेल आणि गॅस साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
मोदींच्या आवाहनानंतर देशभरात ऊर्जा बचत, इंधन संकट आणि संभाव्य आर्थिक परिणाम यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम आशियातील परिस्थिती कशी बदलते, यावर भारताच्या पुढील धोरणांची दिशा ठरणार असल्याचं मानलं जात आहे.