मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थमंत्रालयाने आक्षेप घेतला आहे.
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना
लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना
महिन्याकाठी दीड हजार रुपये मिळणार आहेत.
राज्यभरात या योजनेसाठी महिला अर्ज भरत आहेत.
ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकते,
अशी चर्चा असताना आता अर्थ मंत्रालयाने
या योजनेवरच आक्षेप घेतल्याचे दिसत आहे.
अर्थमंत्री अजित पवारांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस अर्थसंकल्प मांडला.
त्यात त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली.
यापैकी लाडकी बहीण योजना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना
आणण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितले.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतील.
त्याचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या सुमारास मिळेल,
असे सरकारकडून सांगण्यात आले. या घोषणेनंतर महिलांनी
अर्ज भरण्यासाठी गर्दी केली. राज्यभर अर्ज भरले जाऊ लागले.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर आता अर्थ मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे.
राज्यावर ८ लाख कोटींचं कर्ज असताना योजना कशी राबवायची,
असा प्रश्न मंत्रालयाकडून विचारण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे आहे.
ते स्वतः गेल्या तीन आठवड्यांपासून अनेक कार्यक्रमांमधून
लाडकी बहीण योजनेचा आवर्जून उल्लेख करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/ladki-bahine-yojana-election-purtich-sharad-pawar/