टेलिकॉम सेक्टरमध्ये येत्या काही दिवसांत टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये टॅरिफ प्लॅन्सच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे आणि जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल झाला नाही.
त्यामुळे इंडस्ट्री एक्सपर्ट दावा करत आहेत की पुढील काही महिन्यात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ करू शकतात.
२ सिम कार्ड बाळगणं महागणार
जर तुम्ही फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण दुसरं सिम अॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. सध्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी कमीत कमी १५० रुपयांचा रिचार्ज करावा लागतो.
Related News
Airtel चे 3 भन्नाट Unlimited 5G प्लान्स; रोज 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह OTT चा फायदा
Airtel : मोबाईल इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना ग्राहकांसाठी परवडणारे आणि जास्त फायद...
Continue reading
Airtel Recharge Price Hike : एअरटेल ग्राहकांना महागाईचा धक्का? रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढण्याचे संकेत, जास्त डेटा वापरणाऱ्यांना द्यावे लागणार अधिक पैसे
भारतातील...
Continue reading
JioTV Pro Pack : जिओचा 55 रुपयांचा भन्नाट प्लॅन लाँच; मोबाईलवर पाहता येणार 1 हजाराहून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
आजच्या डिजिटल युगात म...
Continue reading
एअरटेलने आपल्या लोकप्रिय ₹549 पोस्टपेड प्लॅनला अचानक बंद केले आहे. आता ग्राहकांसाठी ₹449 आणि ₹699 हे दोनच प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणारे फायदे, OTT बेनिफिट...
Continue reading
BSNL चा 997 रुपयांचा प्रीपेड प्लॅन चर्चेत! मिळवा 150 दिवसांची व्हॅलिडिटी, रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि 5GB बोनस डेटा. जाणून घ्या संपूर्ण माहिती. BSNL चा जबरदस्त ...
Continue reading
Telegram vs Jio : 5 मोठे आरोप, BGP Hijacking म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण वाद
Telegram विरुद्ध Jio! इंटरनेट हायजॅकिंगचे गंभीर आरोप; BGP Hijacking च्या दाव्यामुळे टेक जगतात खळबळ
...
Continue reading
BSNL आणि Jio यांच्यातील स्पर्धा आता आणखी तीव्र झाली आहे. खासगी कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवल्यानंतर ग्राहक स्वस्त आणि जास्त फायदेशीर पर्यायांच्य...
Continue reading
मुकेश अंबानी यांची ५ मिनिटांत २७०० कोटींची रेकॉर्ड ब्रेक डील!
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकेश अंबानी यांनी आपल्या जिओ कंपनीच्या यशाचे गुपित एका विशेष...
Continue reading
मोबाईल वापरणे आता फक्त गरज नव्हे, तर विचार करण्यास भाग पाडणारे महागडं काम ठरत आहे. Mobile Recharge Price Hike मुळे ग्राहकांना थेट आर्थिक दबाव जाणवणार आहे. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आ...
Continue reading
अलीकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio नेत्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. त्यानंतर लोक BSNL कडे वळू लागले आहेत.एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोब...
Continue reading
परंतु टॅरिफ वाढल्यानंतर सिम अॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी १५० रुपयांच्या ऐवजी १८० ते २०० रुपयांपर्यंत बेस प्लॅन जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही दोन सिम वापरत असाल तर तुम्हाला कमीत कमी ४०० रुपयांचा मंथली म्हणजे २८ दिवसांचा रिचार्ज करावा लागेल.
किती दरवाढ होऊ शकते?
जर तुम्ही मंथली ३०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर टॅरिफमध्ये वाढ केल्यावर प्रत्येक महिन्याला सुमारे ७५ रुपये जास्त द्यावे लागू शकतात. तसेच ५०० रुपयांचा मंथली रिचार्ज दरवाढीनंतर १२५ रुपयांनी महाग म्हणजे ६२५ रुपयांचा होऊ शकतो.
५जी प्लॅन देखील होऊ शकतात लाँच
रिलायन्स जिओ आणि एअरटेल लवकरच 5G रिचार्ज प्लॅन लाँच करू शकतात, त्यामुळे आतापर्यंत मिळणाऱ्या फ्री सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे एक सिम 5G आणि एक सिम 4G असेल तर तुमचा मासिक खर्च ५० टक्क्यांनी वाढू शकतो, कारण 5G प्लॅनची किंमत 4G च्या तुलनेत जास्त असेल.
तसेच 4G प्लॅनच्या किंमतीत देखील वाढ केली जाऊ शकते. याआधी देखील बातम्या आल्या होत्या की लोकसभा निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्या दरवाढ करू शकतात.