राज्यात एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा सुरू असताना, दुसरीकडे शासनाने समाजातील अत्यंत दुर्बल घटक असलेल्या अनाथ, निराधार, बेघर व अपंग बालकांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून ‘बाल संगोपन योजनेचा’ निधी थकीत असल्याने हजारो बालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शासनाकडून अनाथ, एकपालक, बेघर व अपंग मुलांसाठी ‘बाल संगोपन योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत दरमहा केवळ २२५० रुपये इतके मानधन दिले जाते. महागाईच्या काळात ही रक्कम आधीच अपुरी असताना, तीदेखील वेळेवर न मिळाल्याने या मुलांच्या शिक्षण, औषधोपचार व दैनंदिन गरजांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मे २०२५ पासून ते जानेवारी २०२६ पर्यंतचा निधी अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध केला जातो. मात्र, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आणि थेट बालकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या योजनेचा निधी रोखला जाणे ही शासनाची असंवेदनशीलता दर्शवणारी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. “लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतात, मग अनाथ बालकांच्या बाबतीतच ही दिरंगाई का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Related News
Ladki Bahin Yojana : धक्कादायक! 33 हजार महिला कायमच्या अपात्र, लाडकी बहीण योजनेत मोठी कारवाई; राज्यभरात खळबळ
“धक्कादायक रहस्य उलगडले! सलग 7 दिवस गायीचे शेताभोवती प्रदक्षिणा, अखेर समोर आला खरा चमत्कार की आजार? 8व्या दिवशी मोठा खुलासा!”
Ladki Bahin Yojana : पात्र असूनही पैसे नाहीत? बच्चू कडू आक्रमक, 30 जूनची मुदत
लाडकी बहीण योजनेत 81 लाख महिला अपात्र; 14 हजार पुरुषांकडून पैशांची वसुली, फडणवीसांची मोठी घोषणा
संजय राऊतांचा स्फोटक आरोप; मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची थेट मागणी
लाडकी बहीण योजनेतून 81 लाख महिलांची नावे वगळली? रोहित पवारांचा धक्कादायक दावा;
-
By
Vivek Raut
“भीषण धक्कादायक मंदिर अपघात 3 मृत्यू: हनुमान मंदिरात ट्रक घुसून मोठा हाहाकार”
Maharashtra Government Decision: एकल महिलांसाठी 7 मोठे बदल; सरकारी योजनांचा लाभ मिळणार अधिक सोपा
मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप! 48 तासांत सुटला वसतिगृहातील ‘भीषण’ उकाड्याचा प्रश्न, अधिकाऱ्यांची उडाली झोप
‘लाडकी बहीण’ योजना ठरतेय आर्थिक डोकेदुखी? राज ठाकरेंच्या पत्राने खळबळ
-
By
Vivek Raut
हाताची मेहंदीही सुकली नाही… संसाराचं स्वप्न भंगलं… भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू
फक्त 2 दिवस उरले! ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे थांबणार? लगेच करा e-KYC, नाहीतर मोठा फटका
या विलंबामुळे अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आमच्याकडे व्होट बँक नाही म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे का?” अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. जर येत्या काही दिवसांत थकीत निधी तात्काळ वितरित करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारला आता तरी जाग येणार का? ‘लाडक्या बहिणींचे’ लाड पुरवताना या अनाथ लेकरांच्या रिकाम्या ताटाकडे शासन लक्ष देणार का, हाच आजचा खरा आणि ज्वलंत प्रश्न आहे.