आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं.
सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत, असा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.
Related News
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दि...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंब...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्...
Continue reading
‘नवरा विकला की काय?’ कमेंटवर Janhavi Killekar संतापली; ट्रोलर्सना सुनावत म्हणाली, ‘तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...’
‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअ...
Continue reading
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश! UPI पेमेंटवर पेट्रोल पंप चालकांचा मोठा इशारा
UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल ...
Continue reading
अमेरिकेत मोठी खळबळ; अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढला, इराणच्या 7 अटींमुळे चर्चेला वेग
कतारच्या माध्यमातून अमेरिकेसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव; मोहसेन रेजाई यांचा निर्णायक युद्धाचा इशार...
Continue reading
Bangladesh सोबतचा गंगा जल करार संपणार; बिहारच्या मागणीमुळे नवा पेच, भारताच्या निर्णयाकडे लक्ष
1996 चा गंगा जलवाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपणार; बिहारच्या पाण्याच्या हक्काचा मुद्...
Continue reading
शिरसाळा गावात आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तसेच जोरदार
घोषणाबाजी देखील करण्यात आली, आता यावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा.
मात्र पोलिसांसमोर दगड उचलण्याची मजल या लोकांची जाते. माजी पालकमंत्री असलेल्या नेत्याच्या
भागातील आणि दुसऱ्या मंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील हे लोक कसे वागतात.
असं म्हणत त्यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पाच टर्म आमदार राहिलो आहे, एकदा राज्यमंत्री होतो तरीही माझ्या गाडीसमोर
अशी पोरकट लक्षणं हे
लोक करतात. हे दगड घेऊन मला मारणार होते का? ते दगड घेऊन मला मारणार नाहीत.
मात्र आम्ही यांच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठीची ही स्पर्धा आहे. मात्र ही गुंडगिरी,
दहशत संपवण्यासाठी मी आता राजकारणात उतरलो आहे.
शिरसाळ्यात जे मार्केट कमिटीने गाळे काढले ते गायरान जमिनीवर काढले.
रस्त्यावर निषेध करायला जे लोक आले ते हे गाळेधारक असावेत किंवा बेकायदेशीर वीटभट्टीवाले असावेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं. यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील
सातत्यानं सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत, मात्र दुसरीकडे सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे आमचे दैवत आहेत, मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही, असं धस यांनी म्हटलं आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/kumpananech-shet-khalle-dahavi-marathicha-paper-center-director-director/