Stock Market Nifty50 Down: फेब्रुवारीमध्येही देशांतर्गत शेअर
मार्केटमध्ये सलग पाचव्या महिन्यात घसरणीचा ट्रेंड सुरु राहिल्यास
निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठ्या पडझडीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
मुंबई : भारतीय शेअर मार्केटवरील दबाव काही कमी होताना दिसत नाही.
सलग दोन आठवडे बाजारात पडझड झाली तर सलग पाचव्या दिवशी बाजाराने लाल रंगात ओपनिंग
केली आणि यासह गुंतवणूकदारांचे नुकसान आणखी खोलवर पोहोचले आहे.
Related News
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
भारतीय शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजार मोठ्या घसरणीसह उघडला आहे.
फेब्रुवारीमध्ये आणखी एक मासिक पडझड झाल्यास भारताचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी50 गेल्या २८ वर्षांतील सर्वात मोठा तोटा नोंदवण्याच्या कड्यावर उभा आहे.
शेअर बाजार विक्रमी विक्रीच्या उंबरठ्यावर उभा
१९९६ नंतर पहिल्यांदाच सलग पाच महिने निर्देशांक घसरण्याची ही घटना असेल.
तसेच देशांतर्गत बाजाराच्या इतिहासात गेल्या ३४ वर्षांत फक्त दोनदाच घडलेली ही दुर्मिळ घटना आहे.
ऑक्टोबर २०२४ पासून दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकून टाकणाऱ्या परदेशी संस्थात्मक
गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) आक्रमक विक्रीमुळे बाजारात सततची कमजोरी दिसून येत आहे.
कमकुवत रुपया उदयोन्मुख बाजारांना भारतीय मार्केटला गुंतवणुकीसाठी कमी आकर्षक बनवत आहे. मात्र,
बाजारातील घसरणीचा अडीच दशकांचा जुना विक्रम आधीच मोडला गेला आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५
दरम्यान सलग चार महिने निफ्टीमध्ये पडझड झाली तर शेवटी असं २००१ मध्ये घडलं होतं.
त्याचवेळी, सप्टेंबर १९९४ ते फेब्रुवारी १९९७ दरम्यान बाजाराने आणखी वाईट काळ पाहिला,
जेव्हा ३० पैकी २० महिने बाजार घसरणी झाली होती.
Read more news here