बोर्डी गावातील जीओ ग्राहकांना रेंजचा त्रास; फाईव्ह-जी नेटवर्कची मागणी तीव्र

जीओ

दोन वर्षांपासून रेंज समस्येमुळे गावकरी त्रस्त, कंपनीकडे निवेदन सादर

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावात रिलायन्स जीओचा टॉवर असूनही गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल रेंजचा मोठा प्रश्न कायम आहे. गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार असून नागरिकांना संवाद साधण्यात अडचणी येत आहेत.

गावात ४जी टॉवर असला तरी सिग्नलमध्ये सातत्याने अडथळे येतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी आता फाईव्ह-जी नेटवर्क सुरू करण्याची मागणी केली आहे.

Related News

या संदर्भात जीओ कंपनीकडे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नंदलाल ताडे, भास्कर मानकर, दर्शन धर्मे, लक्ष्मीकांत जयस्वाल, प्रज्वल चेडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या सह्या आहेत. गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन गावात दर्जेदार नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/devmanus-in-khaki-completed-31-years-of-selfless-service/

Related News