ट्विशा शर्मा आत्महत्या की कट?
बहुचर्चित मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, या प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. ट्विशाच्या मृत्यूपूर्वीचे शेवटचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या फुटेजमध्ये ट्विशा एका सलूनमध्ये अगदी सामान्य आणि शांत अवस्थेत दिसत असल्याने तिच्या मानसिक स्थितीबाबतचे अनेक दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणातील डिजिटल पुरावे ताब्यात घेतले असून, आता प्रत्येक बाब बारकाईने तपासली जात आहे. दरम्यान, सलून मालकाने केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे.
सलून मालकाने काय सांगितलं?
ट्विशा शर्मा ज्या ब्युटी सलूनमध्ये गेली होती, त्या सलूनचे मालक किरण परिहार यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे खुलासे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्विशा शर्मा ही त्यांच्या सलूनची जुनी ग्राहक होती आणि यापूर्वीही ती अनेक वेळा सलूनमध्ये आली होती. मात्र यावेळी ती जवळपास 9 महिन्यांनंतर सलूनमध्ये आली होती.
Related News
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? नायरा नंतर सरकारी कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष
ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याची मागणी; INDIA आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा
शेतकऱ्यांना मदत लवकरच? 10-12 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे लक्ष्य
दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही जाणारच! संजय राऊतांचा सरकारला इशारा
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश विमान अचानक 28 हजार फूट खाली, मोठी खळबळ
SIR वर फडणवीसांचा मोठा खुलासा; 9.78 कोटींवरून 7.71 कोटी मतदारांची नोंद
फडणवीस मोदींचे वारसदार? उपपंतप्रधानपदाबाबत संघात चर्चा असल्याचा राऊतांचा दावा
10ऑक्टोबरला दिल्ली धडकणार CJP; जंतरमंतरसाठी ‘प्लान बी’ रेडी
फ्लायदुबई प्रकरणात मोठा खुलासा; ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती समोर
17 हजार फुटांवर विमानाची घसरण; मुंबईच्या पायलटने धैर्याने उधळला मोठा कट
SIR वर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वगळलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा यादीत येणार
‘Drishyam 3’ रिलीज होताच दिग्दर्शकाच्या पत्नीची भावूक पोस्ट; म्हणाली, ‘कुटुंबाचा प्रश्न आला की माझा पती कधीच मस्करी करत नाही’
किरण परिहार यांनी सांगितलं की, ट्विशाची सासू गिरिबाला सिंह यादेखील नियमित ग्राहक होत्या. ट्विशा सलूनमध्ये आली तेव्हा ती पूर्णपणे सामान्य दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव किंवा अस्वस्थता जाणवत नव्हती. त्यामुळे तिच्या आत्महत्येच्या बातमीने त्यांनाही मोठा धक्का बसला.
‘त्या’ दिवशी आले दोन फोन कॉल
सलून मालकाच्या मते, ट्विशा शर्मा च्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या सासू गिरिबाला सिंह यांनी फोन करून सलूनमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. त्या वारंवार ट्विशा कोणत्या वेळी आली आणि किती वेळ थांबली याबाबत विचारणा करत होत्या.
याशिवाय ट्विशाने पेमेंट कसं केलं? तिच्या भेटीचा काही रेकॉर्ड आहे का? याबाबतही त्यांनी चौकशी केली. मात्र, ट्विशाने त्या दिवशी कोणतंही पेमेंट केलं नव्हतं. कारण तिच्याकडे आधीपासून प्रीपेड सलून पॅकेज उपलब्ध होतं.
सलून मालकाने सांगितलं की, दुपारी पुन्हा एकदा फोन आला. यावेळी गिरिबाला सिंह थोड्या घाबरलेल्या आणि अस्वस्थ वाटत होत्या. त्यांनी ट्विशाने आत्महत्या केल्याची माहिती दिली आणि पुन्हा फुटेजची मागणी केली. या दोन फोन कॉलमुळे आता संशय अधिक गडद झाला आहे.
CCTV फुटेजमुळे निर्माण झाले नवे प्रश्न
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्विशा आरामात बसलेली आणि कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसत आहे. ती कोणत्याही मानसिक तणावाखाली असल्याचं दिसत नाही. त्यामुळे अचानक तिने आत्महत्या का केली? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
पोलिसांनी हे फुटेज तपासासाठी जप्त केलं असून, त्याचा फॉरेन्सिक तपासही होण्याची शक्यता आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, ट्विशाच्या शेवटच्या हालचाली आणि तिच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी हे फुटेज अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
वकिलांसारखे कपडे घालून आले 5 ते 6 लोक
सलून मालकाने आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्विशाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर काही वेळातच पाच ते सहा लोक सलूनमध्ये आले होते. त्यांनी वकिलांसारखे कपडे घातले होते.
या लोकांपैकी एका महिलेने स्वतःला वकील असल्याचं सांगत पोलिसांना फुटेज लागेल असं म्हटलं आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मागितलं. त्यानंतर सलून मालकाने तंत्रज्ञाला बोलावून फुटेज काढून दिलं. या घटनेमुळेही अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
आत्महत्येपूर्वी बुक केलं होतं ट्रेन तिकीट
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ट्विशाने मृत्यूच्या काही दिवस आधीच भोपाळ-जयपूर एक्स्प्रेसचं तिकीट बुक केलं होतं. ती 15 मे रोजी अजमेरला जाणार होती. तिथे तिचा भाऊ मेजर हर्षित शर्मा याची पोस्टिंग आहे.
माहेरच्या लोकांचा दावा आहे की, ट्विशा आत्महत्या करण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उलट तिला काही काळ सासरच्या वातावरणापासून दूर जायचं होतं. त्यामुळेच तिने प्रवासाचं नियोजन केलं होतं.
व्हॉट्सअॅप चॅटमुळे खळबळ
दरम्यान, ट्विशाचं एक व्हॉट्सअॅप चॅटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चॅटमध्ये तिने आपल्या आईला लिहिलं होतं की, “मला गुदमरल्यासारखं वाटत आहे. हे लोक ना मला रडू देतील, ना हसण्याचं कारण देतील.”
या मेसेजमुळे ट्विशाच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसलं होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस या चॅटची सत्यता तपासत असून, तिच्या मोबाईल आणि डिजिटल डिव्हाइसेसची तपासणी सुरू आहे.
पती समर्थ सिंहला अटक
या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी ट्विशाचा पती समर्थ सिंह याला अटक केली आहे. तो गेल्या आठ दिवसांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला जबलपूरमधून ताब्यात घेतलं.
समर्थ सिंहला भोपाळमध्ये आणण्यात आलं असून, सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सुनावणीदरम्यान त्याने अर्ज मागे घेतला. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिसांसमोर शरण जाण्याचे निर्देश दिले होते.
पोलिस तपास वेगात
सध्या पोलिस या प्रकरणातील प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि कुटुंबीयांचे जबाब यांची पडताळणी सुरू आहे.
ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण आत्महत्या आहे की त्यामागे कोणतं मोठं रहस्य दडलं आहे? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरत आहे.
