मूर्तिजापूर |
तालुक्यातील भटोरी गावात शनिवारी (१२ एप्रिल) एक हृदयद्रावक घटना घडली.
सुधाकर वामनराव ठाकरे (वय ६०) या वयोवृद्ध शेतकऱ्याचा स्वतःच्या ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
ही घटना दुपारी अंदाजे चारच्या सुमारास घडली.
ठाकरे हे आपल्या एमएच ३० एव्ही ६१२९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शेतातून घरी येत होते.
परंतु अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर
शेताच्या धुर्यावरून जात असताना असंतुलित होऊन उलटला.
यामध्ये सुधाकर ठाकरे ट्रॅक्टरखाली दबले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला,
परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे भटोरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताबाबत पुंडलीक गोविंदराव कावरे (वय ४५) यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात
अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे आणि पोलीस हवालदार गजानन सैय्यद करत आहेत.