दिल्ली/श्रीनगर | प्रतिनिधी:
जम्मू काश्मीरच्या शांत आणि रम्य वातावरणात पुन्हा एकदा दहशतवादाचा काळा सावट पसरले आहे.
भारताच्या नंदनवनात असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६
Related News
निष्पाप पर्यटकांचा जीव गेला, तर अनेक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा घटनाक्रम (22 एप्रिल)
3:45 PM – पहलगाम येथे गोळीबाराची माहिती
4:04 PM – पोलीस, फौजफाटा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी
4:29 PM – भाजप नेते रवींद्र रैना यांची प्रतिक्रिया
4:30 PM – हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली
5:00 PM – ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
5:37 PM – पंतप्रधान मोदींनी अमित शाह यांच्याशी संपर्क
5:57 PM – अमित शाह यांची कठोर कारवाईची घोषणा
6:03 PM – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा निषेध
6:31 PM – पंतप्रधान मोदींनी गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे आश्वासन
6:56 PM – दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू
🇮🇳 देशभरातून तीव्र प्रतिक्रिया
या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह,
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
श्रीनगरमध्ये मेणबत्ती मोर्चा निघाला तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
जागतिक पातळीवर भारताला पाठिंबा
दहशतवादाविरोधातील या लढ्याला रशिया, अमेरिका, सौदी अरेबिया यांसारख्या देशांचा पाठिंबा लाभला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी खास शोकसंदेश दिला असून डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली.
सौदी अरेबियाचे दौरे रद्द करण्यात आले असून मोदी भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत.
जखमींची नोंद आणि मदत केंद्रांची स्थापना
जखमी पर्यटकांना पहलगाम इस्पितळात दाखल करण्यात आले असून, काश्मीर सरकारकडून
आपत्कालीन हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.
मृतांच्या ओळखी आणि त्यांच्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
सध्याची स्थिती आणि पुढील तपासणी
हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत.
केंद्र सरकारकडून सर्वोच्च स्तरावर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताची भूमिका स्पष्ट – दहशतवाद्यांना माफ नाही!
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “हल्लेखोर कोणतेही असो, त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल“.
देशवासीयांनी एकत्र येऊन शांती, एकता आणि दृढतेचे दर्शन घडवले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-jilaha-parishdechya-timber-fire/