सावधान… वाघ फिरतोय

यवतमाळ : गेल्या आठ दिवसापासून शहराला लागून असलेल्या गोधणी, बोदगव्हाण, लासीना, पिंपरी शेतशिवारात वाघ फिरत असल्याची चर्चा होती.

दोन दिवसापूर्वी वाघाने बैलाचा फडशा पाडला. त्यामुळे वाघ असल्याची खात्री झाली.

त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व खेड्यावरून यवतमाळ येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व नोकरदार यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले.

Related News

शुक्रवारी, ता. 27 रोजी सायंकाळी जामवाडी परिसरात वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाली.

नदी काठावरून वाघ एका म्हैसीच्या मागे लागला होता. यावेळी जामवाडी येथील गुराखी व नागरिक उपस्थिती होते.

या घटनेचे दृश्य कॅमेराबद्ध केले गोदावरी अर्बचे वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांनी.

या माध्यमातून त्यांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून याबाबत वन विभाग व पोलीस विभागाला देखील माहिती दिली आहे.

Related News