अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),
पुणे मार्फत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या ११ विद्यार्थ्यांना अचानक
अपात्र ठरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, हा अन्यायकारक निर्णय असून
Related News
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
त्यांनी याविरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सदर प्रशिक्षण १६ डिसेंबर २०२४ पासून द्वारकाबाई रामराव कुठे प्रशिक्षण संस्था,
अकोला येथे सुरू होते. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या २४ डिसेंबर २०२४ रोजीच्या
शासन निर्णयानुसार आणि बार्टीच्या परिपत्रकानुसार या विद्यार्थ्यांना “दुबार लाभार्थी” ठरवून प्रशिक्षणातून
बाहेर करण्यात आले. विद्यार्थी सांगतात की, त्यांच्या निवडीच्या तारखेनंतरच हे परिपत्रक जारी करण्यात आले असून,
त्यांना अपात्र ठरविणे अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही जिल्ह्यात
अशा प्रकारची कारवाई झालेली नाही, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,
1. अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांना त्वरित प्रशिक्षणात पुन्हा समाविष्ट करावे आणि त्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू करावे.
2. बार्टीचे महासंचालक यांनी लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
3. संबंधित संस्थाचालकावर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
4. आगामी पोलीस भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संधी मिळावी.
विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आता प्रशासन या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/patur-yehe-and-other-marathi-childrens-literature-constant/