बाळापूर नगर परिषद निवडणूक : अखेर १६ तारखेला नामनिर्देशनांना सुरुवात

बाळापूर

बाळापूर : राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. या प्रक्रियेतील बाळापूर नगर परिषद ही १२ प्रभागांची असून, एकूण २५ नगरसेवकांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया १६ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, आजपर्यंत एकच नामनिर्देशन अर्ज दाखल झाला आहे.

प्रथम अर्ज प्रभाग क्रमांक १ मधून अनुजातीतून सौ. प्रमिला रमेश हातोले यांनी दाखल केला. हातोले यांचे नामांकन झाल्यानंतर प्रभागातील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नगर परिषदेकडे येताना त्यांच्या समर्थकांनी फटाके उडवून आणि आतषबाजी करत स्वागत केले.

नामांकन अर्ज स्वीकारताना बाळापूर तहसीलदार इंजि. वैभव फरतारे, निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हातोले यांनी आपल्या प्रभागाचा विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि सुंदर नगर निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी प्रभाग क्रमांक १ मधून सदस्य पदासाठी अर्ज दाखल करून अधिकृतपणे नामांकन प्रक्रियेला सुरुवात केली.

Related News

दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १२ अर्ज दाखल झाले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे १७ नोव्हेंबर ही शेवटची अर्ज दाखल करण्याची तारीख लक्षात घेता, सोमवार रोजी मोठ्या प्रमाणावर नामांकन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि वंचित पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या प्रमाणावर भाग घेण्याची तयारी करत आहेत. प्रभागानुसार सदस्य पदांसाठी विविध उमेदवारांच्या तोंडी स्पर्धा पाहायला मिळणार आहेत.

नगर परिषद निवडणूक ही स्थानिक प्रशासनाच्या विकासासाठी महत्वाची असून, मतदारांनीही आपल्या मताचा उपयोग करण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.

read also : https://ajinkyabharat.com/murtijapur-municipal-council-election-2025-inspection-of-nakayavar-vehicles-started-2/

Related News