मुंबई | 14 एप्रिल 2025:
2016 मध्ये घडलेल्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे.
मुख्य आरोपी आणि पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Related News
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादव हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
वडील दीपक यादव यांनी राधिकेवर ५ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ४ गोळ्या लागून तिचा ज...
Continue reading
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचावा यासाठी महाराष्ट्र सरकार समन्वित योजना राबवणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की, विविध विभाग...
Continue reading
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून,
शशिकांत शिंदे यांची नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. १५ जुलै रोजी नवा प...
Continue reading
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठ...
Continue reading
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी
झाल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना वार्ड क्रमांक ...
Continue reading
नागपूरच्या खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कौलखेड परिसरात एका ३२ वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी
चाकू आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडल...
Continue reading
आज 12 जुलै 2025 रोजी अकोला जिल्ह्यात एक विस्मयकारक नैसर्गिक घटना पाहायला मिळाली.
दुपारी 12 ते 12:15 दरम्यान आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्यसारखे वलय,
म्हणजेच सूर्य प्रभामंडल (Sun ...
Continue reading
गुरुवारी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केलं त्यानंतर त्यावर चर्चा झाली
आणि नंतर आवाजी मतद...
Continue reading
संग्रामपूर प्रतिनिधी-
वारी हनुमान येथील डोहात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 जुलै रोजी दुपारी 2.30
वाजताचे सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव अक्षय सिध्दार्थ भोजने रा. ...
Continue reading
अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत
गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.
ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.
दरम्यान, गायगाव ...
Continue reading
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत.
कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
Continue reading
राज्यभरात शहरांच्या नामांतराची लाट सुरू असताना, पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण
‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी ठाम मागणी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी विधानसभेत केली आहे.
त्यांनी जिज...
Continue reading
तब्बल नऊ वर्षांनी या प्रकरणात न्याय मिळाला असून, यामुळे बिद्रे कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
2016 मध्ये नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे अचानक बेपत्ता झाल्या.
तपासाअंती स्पष्ट झाले की, 11 एप्रिल 2016 रोजी त्यांचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने ही हत्या आपल्या तीन मित्रांच्या मदतीने केली.
हत्यानंतर बिद्रे यांचा मृतदेह लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून वसईच्या खाडीत फेकण्यात आला होता.
काही तुकडे समुद्रात तर मृतदेहाचा धड फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा नंतर समोर आला.
हत्या कशी घडली? – तपशीलवार घटनाक्रम
-
अश्विनी बिद्रे (वय 42) या नवी मुंबई पोलीस दलात मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या.
-
11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास त्या अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्या.
-
त्यानंतर कुरुंदकरने त्यांना कारमध्ये घेऊन भाईंदरकडे रवाना झाले.
-
कारमध्येच गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी कुरुंदकरसोबत महेश फळणीकर हा उपस्थित होता.
-
त्याच रात्री 11:18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला, आणि त्या क्षणापासून त्या बेपत्ता झाल्या.
-
पुढे कुरुंदकरने राजू पाटील, महेश फळणीकर आणि चालक कुंदन भंडारी यांच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले.
काय झाले होते तपासात?
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला संथ गतीने चालला होता. आरोपी स्वतः पोलीस असल्यामुळे तपासात अडथळे आले,
असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला होता. अखेर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आणि यानंतरच हत्येचा उलगडा झाला.
महेश फळणीकर याने दिलेल्या कबुलीमुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघडकीस आले.
न्यायालयाने सर्व आरोपींच्या जबाबांची छाननी करत मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित आरोपींवरही खटला सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pope-francis-yanche-died-88-years-old-ghetla-akhercha-breathing/