अमित शाह हे अपयशी गृहमंत्री! – संजय राऊत

संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं.

अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या,

संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

Related News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत

यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह

यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

अमित शाह पूर्ण ताकद आमच्यासोबत लढण्यासाठी लावत आहेत.

यामुळं दहशतवादी सुटलेत, जम्मू काश्मीर असो की मणिपूर असो

अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा,

असं संजय राऊत म्हणाले. थोडी जरी नैतिकता असेल

तर अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.

जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये

चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते.

यामुद्यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकावर हल्ला चढवला.

अमित शाह पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत.

त्यांचे देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही.

देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही फक्त निवडणूक लढा, निवडणूक जिंका, इथं तिथं दबाव आणा ,

आपल्या विरोधकांना संपवा असा प्रकार सुरु आहे.

देशाच्या विरोधकांना संपवा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

तुमच्यात हिम्मत असेल तर आपले जवान दररोज शहीद आहेत.

तुम्ही कीर्तीचक्र द्याल, पण यानं काही होत नाही. आम्ही त्या जवानांच्या

बलिदानाला शहादत म्हणू पण दररोज जवान शहीद होत आहेत,

असं संजय राऊत म्हणाले. जवानांच्या हत्येला मोदी शाहांचं सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.

नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत.

हत्या म्हणतोय मी, बलिदान, हौतात्म्य मान्य आहे पण या हत्यांना

देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.

नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा.

अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केला.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-ashadhi-ekadashiya-marathmola-good-wishes/

Related News