अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,

अकोल्यातील पाच मोठ्या सराफा दुकांनांवर आयकर विभागाची धाड,

अकोला | प्रतिनिधी

अकोल्यात आज पहाटे आयकर विभागाने मोठी कारवाई करत पाच प्रमुख सराफा व्यापाऱ्यांच्या

दुकानांवर एकाच वेळी धाड टाकली. नागपूर आणि मुंबई येथील

Related News

आयकर अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून,

व्यापाऱ्यांनी करचुकवेगिरी केल्याच्या माहितीच्या आधारावर ही धाड

टाकण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही कारवाई सुरू असताना संपूर्ण सराफा बाजारपेठेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अनेक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण पसरले असून,

बाजारपेठेतील व्यवहारही काही वेळासाठी ठप्प झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्यांच्या बँक व्यवहार,

रोकड आणि सोन्याच्या साठ्यावर तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे अकोल्यातील आर्थिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shaheed-murali-nayak-yanchaya-kutumbasathi-pardesh-yatra-canceled/

Related News