मुंबई | आर्थिक प्रतिनिधी
जागतिक बाजारात सतत चढ-उतार होत असताना, सोन्याच्या किंमतीत देखील मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत “सोनं खरेदी करावं की विकावं?” या प्रश्नाने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Related News
तज्ज्ञांनी मात्र यावर मार्गदर्शन करत सोन्याकडे ‘दीर्घकालीन संपत्ती’ म्हणून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
सोन्याच्या दरात हालचाल
22 एप्रिल रोजी प्रथमच 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख रुपयांच्या पुढे गेला होता.
मात्र त्यानंतर सतत घसरण झाली.
12 मे रोजी सोन्याचा दर 92860 रुपयांपर्यंत घसरला होता, मात्र 13 मे रोजी तो पुन्हा 94070 रुपयांवर पोहोचला.
जागतिक कारणांमुळे घसरण
वे टू वेल्थ च्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ कपातीचा समझोता झाल्यामुळे
जागतिक बाजारात सोन्याची किंमत एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर आली.
यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या साधनांकडे वळले.
दर आणखी कमी होण्याची शक्यता
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस चे रिसर्च हेड नवनीत दमानी यांच्या मते,
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं अजूनही स्वस्त होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले,
“भारत-पाक तणाव कमी झाल्यामुळे देशांतर्गत दर 90,000-91,000 रुपयांदरम्यान स्थिर होऊ शकतात.”
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अक्षा कंबोज यांच्या मते,
जागतिक अनिश्चितता, व्याज दर कपात आणि केंद्रीय बँकांची खरेदी यामुळे दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोन्याचे
भाव पुन्हा वाढू शकतात. सध्याची घसरण ही ‘हळूहळू खरेदी’ करण्याची योग्य वेळ आहे.
तांत्रिक विश्लेषणानुसार घडामोडी
वे टू वेल्थ च्या टेक्निकल विश्लेषणानुसार, एमसीएक्सवर सोन्याचे दर सध्या 92200 ते 97000
रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवस हे दर अस्थिर राहू शकतात.
तज्ज्ञांचा सल्ला: खरेदी करा, पण संयम ठेवा
तज्ज्ञांच्या मते, रिटेल गुंतवणूकदारांनी सोन्याची तात्काळ नफा देणारी मालमत्ता म्हणून नव्हे,
तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करावा. आर्थिक सल्लागारांनी पोर्टफोलिओमध्ये 10-15
टक्के वाटा सोन्याचा असावा, असा सल्ला दिला आहे. दमानी यांनी चांदीतही गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatil-pach-mothy-sarafa-shukananwar-income-tax-department-dhad/
