अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष

अकोल्यात शिवसेनेकडून सैनिकांना सलाम, लाडू वाटून जल्लोष

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत

भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.

या कारवाईनंतर देशभरात भारतीय सैन्याच्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत आहे.

Related News

अकोला शहरात याचे पडसाद उमटले असून  शिवसेना पक्षातर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्याचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आपल्या आनंदाची आणि अभिमानाची भावना व्यक्त केली.

यावेळी भारतमाताची जयघोष, सैनिकांना सलाम आणि देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या.

 शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, “भारतीय लष्कराने जी कारवाई केली आहे,

ती प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या भावना व्यक्त करणारी आहे. अशा धाडसी निर्णयामुळेच भारत आज सुरक्षित आहे.”

भारताने बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, कोटली, सियालकोट यांसारख्या पाकिस्तानच्या आतल्या भागात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

ही कारवाई पहिल्यांदाच पाकिस्तानच्या 100 किमी आत जाऊन पार पडली आहे.

यामुळे भारतीय नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,

अनेक ठिकाणी सैनिकांचे अभिनंदन आणि शौर्यदिन साजरे करण्यात येत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/hi-action-tambu-new-operation-sindoorwar-shaheed-lieutenant-vinay-narwal-yanchaya-wife-himanshi-yanchi-emotional-response/

Related News