अकोला | १४ मे २०२५
अकोल्यातील भगतसिंग चौक, माळीपुरा परिसरात राहणाऱ्या रोहित धर्मराज संदलकर
(वय ३५) यांचा मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान,
Related News
रियान परागचा व्हायरल व्हिडीओ चर्चेत; लहान चाहत्याला फोटो नाकारल्याने सोशल मीडियावर संताप
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 सध्या अतिशय रोमांचक टप...
Continue reading
Pakistan-US Secret Report : काश्मीरवर अमेरिकेचे समर्थन मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, पण भारताबाबत अमेरिकेची स्पष्ट भूमिका
अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारल्याचे चित्र...
Continue reading
Cannes Film Festival 2026 अजूनही हाय हिल्सच्या मोहातून बाहेर पडू शकत नाही? स्नीकर्स घालून क्रिस्टन स्टीवर्टने पुन्हा पेटवली चर्चा
जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक...
Continue reading
उन्हाळ्यात दररोज दही-भात खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? दोन आठवड्यांत दिसू शकतात हे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ खाण्याकडे लोका...
Continue reading
चीनला मोठं यश, दुर्मिळ धातूंमुळे वाढणार जागतिक वर्चस्व
जगभरात युद्ध, आर्थिक स्पर्धा आणि तंत्रज्ञानाच्या शर्यतीत महासत्तांमध्ये संघर्ष सुरू असताना चीनला मो...
Continue reading
Amal Clooney यांचा “धक्कादायक आणि शक्तिशाली” संदेश: आराम आणि अन्याय यातील अस्वस्थ वास्तव
जगभरात अनेक वेळा असे कोट्स समोर येतात जे केवळ प्रेरणा दे...
Continue reading
रोहित अग्रसेन चौकातून आपल्या घरी जात असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, गतिरोधकाजवळ पाणी साचल्यामुळे रोहित यांना पाण्याची खोली
समजली नाही आणि सायकल घसरून ते पडले. यामध्ये डोक्याला जबर मार
लागल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात की नैसर्गिक आपत्ती,
याचा तपास सध्या रामदास पेठ पोलीस करत आहेत.
रोहित हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
त्यांच्या पश्चात आई कमलाबाई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
कमलाबाई संदलकर, मृतकाची आई म्हणाल्या –
“माझा मुलगा पावसामुळे घसरून गेला, सरकारने मदत केली पाहिजे.
आम्ही गरीब लोक आहोत, आमच्यावर आभाळ कोसळलं आहे.
रोहित गेल्यानंतर आम्हाला कोण पाहणार?”
कुटुंबीयांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्ती म्हणून मदतीची मागणी केली आहे.
तसेच या घटनेची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी विनंतीही केली गेली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pm-kisan-yojana-2025-20th-haptay-poori-o-3-kama-nakki/