अकोला महानगरपालिका निवडणूक निकाल : भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर

भाजप

अकोला महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील निवडणूक निकाल हळूहळू स्पष्ट होत असून आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. काही प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, एमआयएम, शिवसेना (ठाकरे व उद्धव गट) तसेच अपक्ष उमेदवारांनी देखील आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

अकोला महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील निवडणूक निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी शहरातील राजकीय समीकरणे स्पष्ट केली आहेत. निकालांनुसार भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली असली, तरी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (ठाकरे व शिंदे गट), एमआयएम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपापली ताकद दाखवून दिली आहे.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसने सर्व 4 जागांवर विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक 2 मध्ये एमआयएमने 3 तर भाजपने 1 जागा जिंकली.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजप 3 व वंचित 1,
तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजप 3 आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) 1 जागेवर विजयी ठरली.

Related News

प्रभाग क्रमांक 5 व 6 मध्ये भाजपने चारही जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले.
प्रभाग क्रमांक 7 मध्ये काँग्रेस 3 व महानगर विकास आघाडी 1,
प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना (ठाकरे) 3 व भाजप 1 जागेवर विजयी झाली.

प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसने क्लीन स्वीप करत 4 जागा,
तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपने 4 जागा मिळवल्या.
प्रभाग क्रमांक 11 मध्येही काँग्रेसने सर्व 4 जागांवर विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजप 2, शिवसेना (शिंदे) 1 व शिवसेना (ठाकरे) 1 अशी संमिश्र लढत पाहायला मिळाली.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजप 3 व अपक्ष 1,
तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये वंचित बहुजन आघाडीने चारही जागांवर विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपने सर्व 4 जागा,
प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 1 व भाजप 1 जागेवर विजयी ठरले.
प्रभाग क्रमांक 18 मध्ये काँग्रेसने 4 जागा,
तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप 3 व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 1 अशी विभागणी झाली.

प्रभाग क्रमांक 16 चा निकाल अद्याप स्पष्ट झालेला नसून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

एकूण निकाल पाहता भाजप आघाडीवर असली, तरी काँग्रेस, वंचित व शिवसेनेची संख्या लक्षात घेता महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी जोरदार राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका देखील निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

read also :  https://ajinkyabharat.com/bjp-vanchitchi-sarshi-in-akola-municipal-corporation-zone-number-5/

Related News