अकोला | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई पोस्टे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून, निवडणूक काळात काळ्या पैशांच्या वाहतुकीवर मोठा आघात मानला जात आहे.
दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत खदान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक इसम लाल रंगाचे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची कॅप घालून मोपेड वाहनावर निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू करत निशू नर्सरी शाळेजवळ नाकाबंदी केली.
Related News
अकोला : अकोला शहरातील नवीन तारफैल परिसरात भरदिवसा घडलेल्या निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर 24 वर्षीय अंकुश नंदागवळी ...
Continue reading
धक्कादायक! एआय व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेचा छळ; मूर्तिजापूरातील 25 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा
मूर्तिजापूर | प्रतिनिधीएआय
डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intell...
Continue reading
अकोला शहरातील गीता नगर परिसरातील एका ओपन स्पेसमध्ये असलेल्या झाडांना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने तसेच धुराचे ल...
Continue reading
अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवघ्या एका तासात मंगळसूत्र चोरट्याला अटक
Akot येथे घडलेल्या एका धक्कादायक मंगळसूत्र चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अत्यंत वेगवान तपास करत अवघ्या एका...
Continue reading
अकोला (रामदासपेठ) येथे प्रेमविवाहातून उद्भवलेल्या वादातून खून; ४ आरोपींना अटक – स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीतील अलंकार मार्केट परिसरात...
Continue reading
पोलिस तपासात मोठा ट्विस्ट ,पती आरोपीस अटक तर पत्नी आरोपीचा शोध सुरू.
महान ते पातूर रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र वसाहत चे बाजूला प्रादेशिक वन विभाग C 67 जंगलात घडलेल्या दुहेरी मृ...
Continue reading
अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवनी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्...
Continue reading
अकोल्याच्या कौलखेड परिसरात शनिवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास काही अल्पवयीन मुलांसह तरुणांच्या टोळीने दिवसाढवळ्या चाकू आणि लोखंडी पाईपने नागरिकांवर हल्ला केला, ज्यामुळे संपूर्ण ...
Continue reading
पातुर तालुक्यातील शाळेत धक्कादायक प्रकार
पातूर, पातुर पंचायत समिती अंतर्गत आलेगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सस्ती येथे एका सहाय्यक शिक्षकानेच महिला सहाय्यक शिक्षिकेचा ...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील खडकी परिसरात घडलेले एक गंभीर खून प्रकरण सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे. दि. ५ मार्च २०२६ रोजी सिटी कोतवाली दवाखाना पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुस...
Continue reading
अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीतील बापू नगर परिसरात धुलीवंदनच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक घटना घडली. घराच्या मालकीच्या वादातून एका भावाने चुलत भावावर चाकूने हल्ला करू...
Continue reading
अकोला, अकोट – काँग्रेस नेते हिदायतउल्ला पटेल खुन प्रकरणात दोन संशयित आरोपींच्या अटकपूर्व जमानत अर्जावर अकोट जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी अ...
Continue reading
नाकाबंदी दरम्यान जुने पारसकर शोरूम ते निशू नर्सरी रोडवरून संशयित इसम मोपेडवर येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. पोलिसांनी स्वतःची ओळख सांगून चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव यश आनंद लालवानी (वय २७ वर्षे), रा. सिंधी कॅम्प, कच्ची खोली, अकोला असे सांगितले.
यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत त्याच्या मोपेडची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोपेडच्या पायाजवळ काळ्या रंगाची थैली आणि डिक्कीमध्ये पांढऱ्या रंगाची कापडी थैली आढळून आली. पंचासमक्ष या थैल्यांची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चलन सापडले.
तपासात खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला –
रोख रक्कम – ५०,००,००० रुपये (पन्नास लाख रुपये)
टी.व्ही.एस. मोपेड वाहन (MH 30 BY 7868) – अंदाजे किंमत ७०,००० रुपये
जुना वापरात असलेला मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन – किंमत अंदाजे १०,००० रुपये
असा एकूण ५०,८०,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदरची रोख रक्कम ही महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वापरण्यात येणार असल्याचा संशय असून, निवडणूक आचारसंहितेअंतर्गत चौकशीसाठी ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला, मा. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, अकोला आणि मा. सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत मनोज केदारे (पोलीस निरीक्षक, पोस्टे खदान) यांच्यासह पोहेकॉ निलेश खंडारे, सफौ दिनकर धुरंदर, पोहेकॉ अमित दुबे, पोका अभिमन्यु सदांशिव, पोका वैभव कस्तुरे, पोहेका प्रविण डोंगरे, पोका आकाश राठोड आणि होमगार्ड विजय घनमोडे यांनी सहभाग घेतला.
निवडणूक काळात पैशांच्या बेकायदेशीर वापरावर पोलिसांचा करडा नजर असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shocking-incident-of-manuskeela-kalima-newborn-child-vihirit-fekalya/#google_vignette