पोलिस तपासात मोठा ट्विस्ट ,पती आरोपीस अटक तर पत्नी आरोपीचा शोध सुरू.
महान ते पातूर रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र वसाहत चे बाजूला प्रादेशिक वन विभाग C 67 जंगलात घडलेल्या दुहेरी मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महान परिसर हादरून गेला होता.
प्रादेशिक वन विभाग C 67 जंगलातील वन तळ च्या भिंतीवरील एका निंबाच्या झाडाला एकाच दोरी च्या सहाय्याने दोन व्यक्तींची मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटना स्थळ वरील परिस्थिती लक्षात घेता हा अपघात,घातपात की आत्महत्या ? या बाबत अनेक तर्क वितर्क रंगत असतानाच आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
मृतकांची ओळख किशोर बळीराम सोनटक्के वय 40 वर्षे राहणार कानडी ( घोटा ) तालुका मुर्तिजापूर जिल्हा अकोला आणि दुसरे मृतक किशोर मारुती बोडखे वय 55 वर्ष राहणार वरुड ( बू! ) तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम अशी असून दोघेही मृतक हे 9 मे पासून घरातून बेपत्ता झाले होते.मृतक किशोर बळीराम सोनटक्के यांचे कुटुंबीयांनी 10 मे रोजी रात्री उशिरा पिंजर पोलिस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल केली होती.तर दुसरे मृतक किशोर मारुती बोडखे यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा मंगरूळपीर पोलिस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल केल्याचे समजते.
मृतक किशोर बळीराम सोनटक्के याने आत्महत्या पूर्वी आपल्या भाच्याला व्हाट्सअप वरती मेसेज करून एक चिठ्ठी पाठवल्याची माहिती समोर आली.त्या मेसेज नंतर नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आणि नातेवाईकांनी मृतक किशोर बळीराम सोनटक्के याचा महान धरण परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असता जंगलातील भयावह दृश्य पाहून सर्वांनाच धक्काच बसला.
Related News
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
VIDEO : ट्रेनमध्ये तिकीट तपासणीवरून वाद; महिलेने स्वतःचे कपडे फाडल्याचा VIDEO व्हायरल
टीसीने तिकीट मागितल्यानंतर महिलेसोबत शाब्दिक बाचाबाची; विनयभंगाचा आरोप, रेल्वे सेवेकडून पुराव...
Continue reading
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून बेपत्ता; नाशिकमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसो...
Continue reading
Budhaditya Rajyog 2026 : पुढील 10 दिवस महत्त्वाचे; या 6 राशींना करिअर, पैसा आणि व्यवसायात लाभाची शक्यता
Budhaditya Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीबदलाला विशेष म...
Continue reading
EPFO चा डबल धमाका! वेतन मर्यादा 25 हजारांवर; EDLI विमा 10.5 लाख होणार?
EPFO EDLI Insurance Scheme : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन...
Continue reading
चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्यावरून रोहित पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान; म्हणाले, “असेल हिंमत तर दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या”
चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून ...
Continue reading
पावसाची प्रतीक्षा संपली! बळीराजा सुखावला; लातूरसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
Maharashtra Weather Update : मराठवाड्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दिलेली ...
Continue reading
Disha Salian : ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते’; राज ठाकरेंची गूढ पोस्ट चर्चेत, नेमका कोणावर निशाणा?
Disha Salian प्रकरण, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नावांवरील चर्चा तसेच अ...
Continue reading
‘अमृताताई हिंदू असतील तर बाहेर येतील’; हळदी-कुंकवावरून मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंत...
Continue reading
मराठा आरक्षण आंदोलनात अण्णा हजारे यांची उडी; Manoj Jarange Patil यांना दिला महत्त्वाचा सल्ला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil ल यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्र...
Continue reading
Rani Mukerjiअस्खलित मराठी भाषण; मराठमोळ्या अंदाजाने जिंकली महाराष्ट्राची मनं!
Rani Mukerji : सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारताना राणीने केलेलं अस्खलित मराठी भाषण आणि तिचा ख...
Continue reading
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Campaign 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघट...
Continue reading
जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसे अनेक धागेदोरे समोर येऊ लागले.मृतकांनी नातेवाईकांना केलेले शेवटचे फोन कॉल, व्हाट्सअप वरील मेसेज आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे संशय अधिक गडद झाला होता.अखेर तपासादरम्यान मृतक किशोर बळीराम सोनटक्के याच्या खिशातून मिळालेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीने संपूर्ण प्रकरणाचे गूढ उलगडले.
मृतक किशोर बळीराम सोनटक्के याने चिठ्ठीत निलेश मोतीराम चौधरी,आणि त्याची पत्नी पूजा निलेश चौधरी यांच्या मानसिक छळ,धमक्या आणि त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा गंभीर उल्लेख केलेला आहे.
या धक्कादायक खुलाश्यानंतर बार्शिटाकळी पोलिसांनी अपराध नंबर 394/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 108, 3 ( 5 ) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी निलेश मोतीराम चौधरी यास अटक करून ताब्यात घेतले आहे.तर दुसरी आरोपी निलेश चौधरी ची पत्नी पूजा निलेश चौधरी हिचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती बार्शिटाकळी पोलिसांनी दिली. दोघे पती,पत्नी आरोपींनी वरील दोन्ही मृतकांना कोणत्या कारणाने मरण्यास प्रवृत्त केले याचा तपासात लवकरच पर्दाफाश होणार आहे.पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक बाळू पवार हे करीत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/petrol-diesel-price-hike-petrol-diesel-price-hike-rbi-kaduna-signal-may-give-a-big-blow-to-common-people/