अकोला : अकोला जिल्ह्यातील युवा विचारपीठ प्रतिष्ठान ही सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबवणारी मान्यवर संस्था. गेल्या काही वर्षांत संस्थेने विविध उपक्रमांतून तरुणांच्या कला आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी भक्कम मंच निर्माण केला आहे. त्यातीलच बहुचर्चित आणि प्रतिष्ठेचा उपक्रम म्हणजे ‘अकोला आयडॉल’ राज्यस्तरीय महागायन स्पर्धा, जी अल्पावधीतच महाराष्ट्रातील संगीतप्रेमींसाठी अभिमानाची परंपरा बनली आहे.
२०२२ मध्ये सुरुवात – आज राज्यभरात मान्यता
२०२२ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेने चारच वर्षांत महाराष्ट्रातील शेकडो गुणी गायकांना आपली कला सादर करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळवून दिले आहे. प्राथमिक ते अंतिम फेरीपर्यंत सादर होणाऱ्या सुरेल कार्यक्रमांमुळे ‘अकोला आयडॉल’ हा नावाजलेला संगीत सोहळा ठरला आहे.
अकोला आयडॉल पर्व ४ ला उत्साहवर्धक प्रतिसाद
यंदा अकोला आयडॉल पर्व ४ चे आयोजन अधिक भव्य होत असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील स्पर्धक या व्यासपीठावरून आपल्या गायनकलेची चमक दाखवणार आहेत.
संगीताच्या विविध रंगांनी नटलेला हा सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने संगीतप्रेमींसाठी पर्वणीच आहे. प्रत्येक पर्वात नामांकित गायक, संगीत दिग्दर्शक, तसेच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन करतात.
Related News
गुणवान स्पर्धकांना राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याची संधी
स्पर्धेतून निवड झालेल्या कलावंतांना राज्यस्तरासह राष्ट्रीय स्तरावरही आपले स्थान निर्माण करण्याची मौल्यवान संधी मिळते. अनेक तरुणांनी याच मंचावरून आपल्या संगीत प्रवासाची सुरूवात करून पुढे प्रतिष्ठित स्तरावर नाव कमावले आहे.
स्पर्धेची महत्त्वाची वेळापत्रक
प्रथम ग्राउंड ऑडिशन : ७ डिसेंबर २०२५
स्थळ : श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाउपांत्य फेरी : १४ डिसेंबर २०२५
ग्रँड फिनाले : २१ डिसेंबर २०२५
वयोगट
स्पर्धा पुढील तीन वयोगटांत आयोजित केली आहे —
४ ते १६ वर्षे
१७ ते ३۵ वर्षे
३६ वर्षे आणि पुढे
नोंदणी प्रक्रिया
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी ‘Akola Idol’ या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर जाऊन नोंदणी करू शकता.
आयोजन समितीची माहिती
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी युवा विचारपीठ प्रतिष्ठान तर्फे पुढील मान्यवरांनी माहिती दिली :
अध्यक्ष : प्रा. निलेश ढाकरे
उपाध्यक्ष : सौ. स्मिता अग्रवाल
मुख्य समन्वयक : श्री राजेश अग्रवाल
कार्यकारी समन्वयक : श्री कौशिक पाठक, डॉ. गणेश पोटे, डॉ. नितीन देशमुख, श्री गिरीधर भोंडे, ऍड. शेषराव गव्हाळे, डॉ. संजय तिडके, प्रा. योगेश मल्लेकर, प्रा. विनय जकाते, प्रा. सुदेश काळपांडे, प्रा. कोमल चिमणकर, सौ. अश्विनी ढोरे, कु. सुरभी दोडके, डॉ. तृप्ती भाटिया.
