विमान प्रवास झाला स्वस्त!

दिवाळीला सर्वचजण आपापल्या घरी जातात. अनेकजण

नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून दूर असतात.

दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला विमानाने घरी जायचे असेल. तर

Related News

अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत

यंदा विमानाच्या प्रवास भाड्यात सरासरी २० ते २५ टक्क्यांची

घसरण झाली आहे. त्यामुळे आता विमान प्रवास करणे स्वस्त

झाले आहे. त्यामुळे आता विमान प्रवास भाड्यात २० ते २५

टक्क्यांची घसरण झाल्यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा

मिळाला आहे. विमान प्रवासात नेमकी घसरण का झाली?

असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका अहवालानुसार,

अलीकडेच तेलाच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे

विमानाचे प्रवास भाडे कमी झाले आहे. कोणत्या मार्गावर

किती भाडे कमी झाले, याबाबतची माहिती पाह्यात. ट्रॅव्हल

प्लॅटफॉर्म इक्सीगोच्या अहवालानुसार, देशांतर्गत मार्गावरील

सरासरी विमान भाडे २०-२५ टक्क्यांनी घटले आहे. या किमती

३० दिवसांच्या आगाऊ खरेदी तारखेवर आधारित सरासरी एक

मार्ग भाड्यासाठी आहेत. अहवालात २०२३ चा कालावधी १०

ते १६ नोव्हेंबर आहे. तर या वर्षी तो २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर

असा आहे. गेल्या वर्षी मर्यादित क्षमतेमुळे दिवाळीच्या आसपास

विमान भाड्यात वाढ झाली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/athavadabharat-55-thousand-kotinchi-online-shopping/

Related News