देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाजवळच्या अंडरग्राउंड पार्किंगविरोधात आंदोलक आक्रमक
कामकाजाच्या साहित्याची केली तोडफोड..
Related News
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट
मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कुरघोडी? राजकीय वर्तुळात चर्चा
गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं… काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?
मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणा स्थान असलेल्या
नागपूरच्या दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगला
आंबेडकरी अनुयायांनी केलेला विरोध पाहून सरकारने या बांधकामाला
स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात जाहीर केले.
नागपूरच्या दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंग योजनेमुळे
येथील स्तूपाला धक्का पोहचू शकतो त्यामुळे या पार्किंग विरोध करण्यासाठी
सोमवारी दुपारी नागपूर येथे मोठे आंदोलन झाले.
त्यानंतर येथे प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
अनेक राजकीय पक्षांनी या भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे.
त्यानंतर उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
या पार्किंगच्या कामाला स्थगिती देत असल्याचे विधीमंडळात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
नागपूर दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग साठी
स्मारक समितीने एक आराखडा तयार केला होता.
200 कोटी त्यासाठी दिलेले आहेत.
दीक्षाभूमी स्मारक समितीने हा आराखडा मान्य केलेला आहे.
या ठिकाणी आज काही संघटनांनी आंदोलन केले आहे.
हे अंडरग्राउंड पार्किंग करू नये म्हणून आंदोलन सुरु आहे.
संपूर्ण आराखडा हा स्मारक समितीने मंजूर केलेला असला
तरी हे स्मारक देशभरातील लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थान आहे.
त्यामुळे अशा स्वरुपाचे काम होताना सर्व पक्षीयांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.
सरकारने केवळ निधी दिलेला आहे.
परंतू सध्या लोकभावना लक्षात घेता या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले.
दीक्षाभूमी समितीची स्थानिक लोकांसोबत बैठक घेऊ त्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.