ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रगीतासाठी मैदानात आले.
तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी मैदान व्यवस्थापनाने भारताचे राष्ट्रगीत वाजवले.
व्हिडिओमध्ये ‘भारत भाग्य विधाता’ हे राष्ट्रगीताचे बोल ऐकू येत आहे.Champions Trophy:
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
चँपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळ सोशल मीडियावर टीकेचे लक्ष बनत आहे.
आता पीसीबीकडून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी एक घोडचूक झाली.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले. पाकिस्तानातील लाहोर येथील
गद्दाफी स्टेडियममध्ये जन गण मन…’ सुरु झाले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली.
त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळ ट्रोल झाले आहे. भारतीय संघाचे सामने पाकिस्तानात होत नाही.
पाकिस्ताच्या भूमीत खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नकार दिल्यामुळे भारताचे सामने दुबईत होत आहे.
काय घडली घटना
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रगीतासाठी मैदानात आले.
तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी मैदान व्यवस्थापनाने भारताचे राष्ट्रगीत वाजवले. व्हिडिओमध्ये ‘भारत भाग्य विधाता’
हे राष्ट्रगीताचे बोल ऐकू येत आहे. मात्र, काही सेकंदातच भारतीय राष्ट्रगीत थांबवण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत लावण्यात आले.
पाकिस्तान मंडळ ट्रोल
पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ही चूक आश्चर्यकारक आहे. कारण या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळणार नाही.
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला.
त्यानंतर भारताचे सर्व सामने दुबईत खेळत जात आहे. यामुळे आयोजकांची ही चूक गंभीर आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पीसीबी ट्रोल झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याची सुरुवात चांगली झाली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/unknown-vaunachi-aged-mahilas-vigorous/